एस जी विद्यालय कोपरगाव
एस.जी विदयालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने वेशभुषा स्पर्धेचे आयोजन
एस.जी विदयालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने वेशभुषा स्पर्धेचे आयोजन
एस.जी विदयालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने वेशभुषा स्पर्धेचे आयोजन
कोपरगाव विजय कापसे दि १८ जानेवारी २०२५ – श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी विदयालयात वेशभूषा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी विविध प्रेरणादायी वेशभूषा परिधान करून मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवी पहिल्या गटात प्रथम क्रमांक कु. अक्षदा आनंद हिंगमिरे (राजमाता जिजाऊ) द्वितीय क्रमांक उमर निसार पठाण (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) तृतीय क्रमांक कु. श्रद्धा विजय अंभूरे (सावित्रीबाई फुले) तर इयत्ता आठवी ते दहावी गटांमध्ये प्रथम क्रमांक कुमारी सना अफजल शेख (महाराणी ताराबाई ) द्वितीय क्रमांक निलेश अंबादास चंदनशिव (प्रभू श्रीराम ) तृतीय क्रमांक किशोरी मनोज पगारे (राजमाता जिजाऊ) यांनी यश मिळवले.यशस्वी व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, सदस्य संदीप अजमेरे ,राजेश ठोळे, डॉ.अमोल अजमेरे,आनंद ठोळे मुख्याध्यापक रमेश गायकवाड ,उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे ,पर्यवेक्षक अनिल अमृतकर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक कुलदीप गोसावी यांनी केले तर आभार दीलीप कुडके यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख अतुल कोताडे, योगेश गवळे, श्रीकांत डांगे,संजय बर्डे सर,अजमेरे एस आर,सौ सोनवणे व सौ.निंबाळकर डरांगे एस.टी आदींनी परिश्रम घेतले.