आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलेल्या प्रमुख मागण्या
1) संगमनेर नगरपरिषद हद्दीतील संगमनेर बस स्थानकावर श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा करण्यासाठी दि. 16 नोव्हेंबर 2023 रोजी तत्कालीन पालकमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये 01 कोटी रु. निधी जाहीर करण्यात आला होता, परंतु मागील 4 महिन्यापासून यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही म्हणून यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी व निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.

2) आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मितीचा प्रस्ताव मंत्रालयात पोहोचला आहे, परंतु या प्रस्तावात ज्या गावांचा समावेश करण्यात आला आहे, ते पाहता हे विभाजन प्रशासकीय सोयीसाठी नसून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट होते. संगमनेर शहराच्या अगदी जवळ असलेली गावे देखील संगमनेर तहसील कार्यालयापासून वेगळी करण्यात येणार आहेत, यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे. प्रशासन जर राजकीय दबावाखाली येऊन हा निर्णय घेत असेल तर हे चुकीचे आहे. त्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी.

3) अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शहरांमधील सीसीटीव्ही कॅमेरांची देखभाल व दुरुस्ती ही पोलिसांमार्फत झाली पाहिजे. स्थानिक नगरपालिका यांच्याकडे त्यासाठी कुठलाही अतिरिक्त निधी नाही त्यामुळे पोलिसांनी त्यासाठी निधीची तरतूद करावी. याबाबत पालकमंत्री महोदयांनी पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांना त्याबाबतचे आदेश दिले.
4) संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील श्री क्षेत्र चैतन्य मच्छिंद्रनाथ मठ देवस्थान, आश्वी बु. येथील श्री. चैतन्य महाराज देवस्थान, खळी येथील श्री. खंडोबा महाराज देवस्थान व निळवंडे येथील श्री. दत्त महाराज देवस्थान चैतन्य कानिफनाथ (शिवगिरी महाराज समाधी) या 4 तीर्थक्षेत्रांना “क” वर्गाचा दर्जा मंजूर करणे.

5) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये अहिल्याबाईंनी निर्माण केलेल्या बारवांच संवर्धन करणे व त्यांना स्मारक जाहीर करणे तसेच यामध्ये संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील बारवाचा देखील समावेश करावा ही मागणी केली.
6) संगमनेर तालुक्यातील खांबे व कौठे कमळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामे मंजूर असून निधी उपलब्ध नसल्यामुळे ते कामे सुरू झालेले नाहीत, त्यासाठी लवकरात लवकर निधीची तरतूद करून कामे सुरू करावीत.

7) संगमनेर, अकोले, कोपरगाव तालुक्यात वीज खंडित होणे तसेच कमी दाबाने वीज मिळणे हे प्रश्न सातत्याने जाणवत होते कारण या भागातील वीजेचा पूर्ण लोड हा सध्या बाभळेश्वर सबस्टेशन वर आहे, त्यामुळे बाभळेश्वर स्टेशन हे वीज लोड क्षमतेच्या बाहेर गेले असून या प्रश्नांवर पर्याय म्हणून मेंढवण येथे 132KV चे नवीन सबस्टेशन मंजूर करणे. जेणेकरून संगमनेर, अकोले व कोपरगावच्या काही भागासाठी वीजेची व्यवस्था होईल.
8) संगमनेर तालुक्यातील तामकडा ( चंदनापुरी ) तसेच खांबे येथे जलसंधारण खात्यातून बंधारे करण्यासाठी 05 महिन्यापूर्वी टेंडर प्रक्रिया झालेली आहे, परंतु अद्याप पर्यंत ते कामे सुरू झाले नाही. ते कामे लवकरात लवकर सुरू करावेत.
9) संगमनेर तालुक्यातील चिखली येथील स्मशानभूमी विकसित करण्यासाठीचे काम 26 जून 2023 सुरू झाले त्यानंतर दोन महिन्यात ते पूर्णही झाले. परंतु त्या कामाचे M.B. Record अजूनही झालेले नाही तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना कामाचे पैसे मिळालेले नाही. त्यामुळे या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.