संगमनेर

सॅफ्रॉन सफायर आयडॉल स्पर्धेला गायकांचा प्रचंड प्रतिसाद

सॅफ्रॉन सफायर आयडॉल स्पर्धेला गायकांचा प्रचंड प्रतिसाद

सलग १० व्या वर्षी भविष्यातील गायक घडविण्यासाठी विशेष प्रयत्न
जाहिरात आत्मा

संगमनेर विजय कापसे दि ५ फेब्रुवारी २०२५ लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या वतीने युनिकॉल एडेजिव्ह, मालपाणी ग्रुप प्रायोजित आयडॉल या वैयक्तित गीत गायन स्पर्धा दि. ३० व ३१ जानेवारी रोजी मालपाणी लॉन्स येथे संपन्न झाली. सलग १० व्या वर्षी या स्पर्धेला गायकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

जाहिरात

स्पर्धेचे उदघाटन निलम अमोल खताळ यांच्या हस्ते झाले तर समारोप आणि बक्षिस वितरण इनरव्हिल क्लब गव्हर्नर रचना मालपाणी यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून लायन्स संगमनेर सॅफ्रॉनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी व झोन चेअरमन प्रशांत रूणवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख संदीप चोथवे, सुनिता मालपाणी, प्रशांत रूणवाल व प्रा.डॉ. जितेंद्र पाटील यांनी विशेष प्रयत्न घेतले. सूत्रसंचलन प्रा.डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले.

जाहिरात

प्रथम गटात श्रीमई अमोल सानप विजेती ठरली तर गार्गी रासणे द्वितीय, वेदश्री काळे तृतीय, जैन सुहाणी चतुर्थ, ऐश्वर्या भुतडा उत्तेजनार्थ, धुमाळ श्रुती उत्तेजनार्थ यांना बक्षिसे मिळाली. द्वितीय गटात रिषभ म्हसे विजेता ठरला तर आराध्या महाजन द्वितीय, नक्षत्र घेगडमल तृतीय, धुत मधुरा चतुर्थ, रूद्रांशी रानडे उत्तेजनार्थ, अनया पाठक उत्तेजनार्थ यांना बक्षिसे मिळाली. तृतीय गटात आर्या लवळेकर विजेती ठरली तर अक्षरा ढमाले द्वितीय, श्रवण मुंदडा तृतीय, सामर्थ्य वैद्य चतुर्थ, राजश्री गांडोळे उत्तेजनार्थ, अक्षरा पडवळ उत्तेजनार्थ यांना बक्षिसे मिळाली. चतुर्थ गटात वैष्णवी मुर्तडक विजेती ठरली तर गौरव बिडवे द्वितीय, किरण गायकवाड तृतीय, सचिन देशमुख चतुर्थ, संतोष जाधव उत्तेजनार्थ, डॉ. शैलेश गायकवाड उत्तेजनार्थ यांना बक्षिसे मिळाली.

जाहिरात

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्लबच्या अध्यक्षा स्वाती मालपाणी माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, खजिनदार पूजा मर्दा, प्रिती काळे, नम्रता अभंग, उमेश कासट, अतुल अभंग, प्रा. श्रीहरी पिंगळे, विशाल थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. परिक्षक म्हणून डॉ. उमा कुलकर्णी, सतिष मालवणकर, प्रशांत रूणवाल, राम आहेर यांनी काम पाहिले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे