आपला जिल्हा

अमानुषपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकावर कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई

अमानुषपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकावर कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई
अमानुषपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकावर कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि ५ फेब्रुवारी २०२५कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी वाढत्या अवैध व्यवसायावर कडक कारवाई सुरू केली असून त्याच उद्देशाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्ग टोलनाक्याजवळ शहर पोलिस पथकाला तपासणी वेळी बुधवार दि ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ४ वाजून १५ मिनिटांच्या  सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या योद्धा पिकअप मध्ये अमानुषपणे जनावरांची गोवंश करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आले असता कोपरगाव शहर पोलिसांनी त्यांचा वर कारवाई केली आहे.

जाहिरात
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे यांच्या फिर्यादीनुसार वैजापूर तालुक्यातील बायगाव येथील अंकुश देविदास जाधव व पवन कपूरचंद राजपूत हे दोघं त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या योद्धा पिकअप गाडी नंबर एम एच १५ जी व्ही ९१३७ मध्ये ४ गोवंश जातीच्या जर्शी गाई व १ बैल पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कोणतेही प्रमाणपत्र न घेता तसेच वाहनांमध्ये कुठल्याही प्रकारे मँटिंग गादी न टाकता तसेच सदर वाहनाला प्राण्यांची वाहतूक असा फलक न लावता तसेच प्राणी वाहतुकीचा कुठलाही परवाना नसताना त्यांच्याकडील वाहनांमध्ये  ४ गाई व १ बैल अत्यंत निर्दयपणे व वेदना होतील अशा पद्धतीने भरून विनापरवाना कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आले असता त्या दोघांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये ३७/२०२५ महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९७६ चे कलम ५,९ व प्राण्यास निर्दयपणे वागणे कलम ११/ (१) (ड), महा पोलीस अधिनियम ११९ केंद्रीय वा.का कलम १२५ महा.वा.का कलम १३० (३) /१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
याप्रसंगी पोलिसांनी आरोपीकडून ३० हजार रुपये किमतीची १ गोवंश जातीचा बैल, ८० हजार रुपये किमतीच्या ४ गोवंश जातीच्या ४ गाई व ३ लाख रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची योद्धा पिकअप गाडी असा एकूण ४ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल के.ए. जाधव हे करत आहे.

जाहिरात
काल्पनिक चित्र

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे