संगमनेर
आश्वी अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय तातडीने रद्द करावा; युवक काँग्रेसची मागणी: अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार : युवक काँग्रेस आक्रमक

आश्वी अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय तातडीने रद्द करावा; युवक काँग्रेसची मागणी: अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार : युवक काँग्रेस आक्रमक

संगमनेर विजय कापसे दि १४ फेब्रुवारी २०२५—लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा राज्याला दिशादर्शक ठरला आहे. मात्र संगमनेर तालुक्याचे महत्त्व कमी करण्यासाठी राजकीय उद्देश ठेवून तालुका तोडण्याचा कुटील डाव सत्ताधाऱ्यांनी आखला आहे. लोक भावनेचा सन्मान करून अश्वि बुद्रुक येथे प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे