संगमनेर

कौठे कमळेश्वर सोसायटीवर लोकनेते बाळासाहेब थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व

कौठे कमळेश्वर सोसायटीवर लोकनेते बाळासाहेब थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व
कौठे कमळेश्वर सोसायटीच्या चेअरमनपदी भिकाजी भडांगे तर व्हा चेअरमन पदी सुशीला जोंधळे यांची निवड
जाहिरात आत्मा

संगमनेर विजय कापसे दि ५ मार्च २०२५तालुक्यात राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कौठे कमळेश्वर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी भिकाजी बाळाजी भडांगे तर व्हा. चेअरमनपदी सुशीला कुंडलिक जोंधळे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे. 

जाहिरात
 लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा सोसायटीने कायम सभासद व कर्जदारांचे हित जोपासत आर्थिक दृष्ट्या चांगली प्रगती केली आहे. व आता या सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी भिकाजी बाळाजी भडंगे तर व्हा. चेअरमनपदी सुशीला कुंडलिक जोंधळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी संचालक बाळासाहेब भडांगे , दत्तू जोंधळे ,सयाजी भडांगे ,रावसाहेब जोंधळे ,जिजाबा धात्रक, अण्णासाहेब जोंधळे ,सोपान यादव, संगीता खांडरे आदी मान्यवर उपस्थित होते.  या निवडकामी उपनिबंधक कार्यालयाचे प्रवीण वीरनारायण, श्री वाकचौरे व सचिव वदक हे उपस्थित होते.

जाहिरात

    या निवडीसाठी सोपानराव जोंधळे गणपत भडांगे ,रावसाहेब थोरात, राधाकिसन जोंधळे ,रवींद्र खांडरे, भडांगे सर ,सोनाजी धात्रक, बाळासाहेब कापकर ,सोमनाथ भडांगे, ज्ञानेश्वर यादव, विकास लहामगे, विकास जोंधळे, वाल्मीक जोंधळे ,भीमा जोंधळे ,अशोक भडांगे आदींनी विशेष परिश्रम घेतले. या नवनिर्वाचित  संचालक मंडळाचा यशोधन कार्यालय येथे सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याधिकारी डॉ. नितीन भांड व रामदास तांबडे आदी उपस्थित होते.

जाहिरात

       नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आ.डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, ॲड माधवराव कानवडे, कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात, सौ दुर्गाताई तांबे,डॉ. जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ, महेंद्र गोडगे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे