संगमनेर

थोरात कारखान्याच्या विस्तारित डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाचा रविवारी शुभारंभ

थोरात कारखान्याच्या विस्तारित डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाचा रविवारी शुभारंभ

८ लाख ७७७ साखर पोत्यांचे पूजन

संगमनेर विजय कापसे दि ५ मार्च २०२५देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेला व तालुक्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वा. होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

जाहिरात आत्मा

याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात सहकारी साखर कारखाने नव्याने उभारलेल्या 5500 मे टन क्षमतेच्या कारखान्यातून मागील तीन वर्षापासून दहा लाख मे.टन पेक्षा जास्त ऊस गाळप झाले आहे. यावर्षीही चांगले गाळप होईल. या कारखान्याने कायम तालुक्याच्या विकासात मोठे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच या कारखान्याला देश पातळीवरील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून दोन वेळा गौरवण्यात आले आहे. तर तांत्रिक कार्यक्षमता आणि उत्पादनाबाबत 16 राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला आहे. याचबरोबर 11 वेळा राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार दोन वेळा राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार आणि कार्यकारी संचालक व व्यवस्थापनासाठी दोन वेळा सन्मान झाला आहे.

जाहिरात

कारखान्याने उभारलेल्या विस्तारित डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ आणि सन 2024 – 25 या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या आठ लाख 777 व्या साखर पोत्याचे पूजन रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते तर मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

जाहिरात

यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पाटील खेमनर यांच्यासह संगमनेर तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात

तरी या साखर पोत्याचे पूजन व इथेनॉल प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व सभासद शेतकरी ऊस उत्पादक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व्हा.चेअरमन संतोष हासे सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

इथेनॉल निर्मितीमुळे राष्ट्रीय कार्यास हातभार

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विस्तारित डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पातून प्रतिदिन 80 हजार लिटर इथेनॉल निर्मिती करण्यात येणार असून यामुळे राष्ट्रीय कार्यास हातभार लागणार आहे. विस्तारित डिस्टलरी प्रकल्पातून बाहेर पडणारे सांडपाणी वाफे द्वारे घट्ट केले जाईल. आधुनिक इन्सिनरेशन बॉयलर मध्ये जाळले जाऊन त्यातून पोटॅशियम युक्त राख तयार केली जाते. ही राख अमृत शक्ती दाणेदार खतांमध्ये मिसळली जाऊन अधिक गुणवत्ता पूर्ण खतांची निर्मिती होईल अशी माहिती कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी दिली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे