अमृतवाहिनी अभियांत्रिकीत पुणे विद्यापीठाची ‘नशामुक्त भारत’ कार्यशाळा उत्साहात संपन्न
अमृतवाहिनी अभियांत्रिकीत पुणे विद्यापीठाची ‘नशामुक्त भारत’ कार्यशाळा उत्साहात संपन्न
संगमनेर विजय कापसे दि १५ मार्च २०२५– प्रत्येकाने मोबाईल व सोशल मिडीयाचे वैयक्तीक जीवनातील व्यवस्थापन करुन सकारात्मक उपक्रमांतून आनंदात , उत्साहात आणि नावीण्याचा शोध घेण्यासाठी, शिकण्यासाठी दैनंदिन वेळ घालवावा असे आवाहन नाशिक येथील मोमेंटम प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षक, मानसतंज्ञ व समुपदेशक उर्जा पाटील यांनी केले.जाहिरात आत्मा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय एकदिवशीय कार्यशाळा “नशामुक्त भारत” या विषयावर उत्साहात संपन्न झाली.जाहिरात
यावेळी प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधिनतेच्या सद्यस्थितीमधील कल्पना दिली आणि आपण यापासून स्वतःस कसे दूर ठेवावे याबद्दल मार्गदर्शन केले.
जाहिरात
यावेळी उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रमेश पावसे, आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. भारत बोरकर, सिव्हील विभागाचे प्रमुख डॉ. सचिन कांडेकर, एम.बी.ए.च्या विभाग प्रमुख डॉ. वृषाली साबळे उपस्थित होते.
जाहिरात
एक दिवशीय कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सौ. उर्जा पाटील यांनी “मोबाईल व सोशल मिडीयाचे वैयक्तीक जीवनातील व्यवस्थापन” या विषयावर उपस्थितांशी संवाद साधतांना वेगवेगळ्या उपक्रमांचा वापर केला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारुन आपापली मते व्यक्त केली. विद्यार्थ्यांना यावेळी मोबाईल व सोशल मिडीयाच्या व्यवस्थापनाचे महत्व भावले आणि काही विद्यार्थ्यांनी योग्य वापराचा संकल्प आपल्या प्रतिक्रयांमध्ये व्यक्त केला. दुपारच्या सत्रामध्ये समुपदेशक व आर.बी.एन.बी. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. मनिषा निफाडे यांनी युवा जिवनातील व्यसन व त्यावरील उपाय या विषयावर विद्यार्थ्यांना अंतर्मुख करण्यास भाग पाडले. यावेळी त्यांनी व्यसन म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते? सुरुवात कशी होते? आणि आपण स्वतः त्या नकारात्मकतेकडे जाणे कसे टाळावे या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी अहमदनगर, शेवगांव, जुन्नर, संगमनेर व परिसरातील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आणि अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाचे एकुण- २०७ विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समन्वयाने अमृतवाहिनी अभियांत्रिकीत नेहमी नवनीवन उपक्रम सुरु आहे याबद्दल अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष मा. आ. बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ. सुधीर तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त शरयुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अॅकेडेमिक्स डॉ.जे.बी.गुरव, प्राचार्य डॉ.एम.ए. व्यंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे यांचेकडून कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. रमेश पावसे यांनी केले, सुत्रसंचालन प्रा. मनिषा लांडगे यांनी केले.