आपला जिल्हा
माजी पोलीस अधीक्षक के.पी रोकडे यांचे निधन
माजी पोलीस अधीक्षक के.पी रोकडे यांचे निधन
माजी पोलीस अधीक्षक के.पी रोकडे यांचे निधन
कोपरगाव विजय कापसे दि ५ जुन २०२५– कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील भूमिपुत्र राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्काराचे मानकरी के पी रोकडे यांचे वयाच्या ७९ वर्षी गुरुवार दिनांक ५ जून रोजी दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार दि ५ जुन रोजी संध्याकाळी पाच वाजता कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे होणार आहे.

अत्यंत मनमिळावू व हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित असलेले कचेश्वर पांडुरंग रोकडे उर्फ के पी रोकडे साहेब यांना त्यांच्या पोलीस खात्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल तत्कालीन भारताचे राष्ट्रपती के आर नारायणन यांनी २६ जानेवारी १९९९ मध्ये त्यांना सर्वोच्च समजला जाणारा राष्ट्रपती पोलीस पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यामुळे संपूर्ण कोपरगाव तालुक्यासह महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला होता.के पी रोकडे हे उद्योजक प्रमोद रोकडे व पुणे येथील आंतरराष्ट्रीय लोन देवास प्रशिक्षक नंदकुमार रोकडे यांचे वडील होते. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यात सहभागी होत बहुजन विकास एकता समितीची स्थापना करत सामाजिक कार्य करत अनेक गोरगरीब मुला-मुलींना पोलिसात जाण्यासाठी मार्गदर्शन केले होते त्यांच्या या कार्याची दखल घेत ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगाव यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०१६ मध्ये देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



