आपला जिल्हा

संजीवनी पॉलीटेक्निकच्या सहा अभियंत्यांची आयएफबी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत नोकरीसाठी निवड

संजीवनी पॉलीटेक्निकच्या सहा अभियंत्यांची आयएफबी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत नोकरीसाठी निवड
अंतिम निकालाच्या अगोदरच हातात नोकरीचे पत्र
जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि १२ मे २०२५: संजीवनी के.बी.पी.पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड  पी) विभागाच्या प्रयत्नाने अंतिम वर्षातील  विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्यासाठी या विभागाने आयएफबी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात कंपनीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या सहा अभियंत्यांची आकर्षक  पगारावर नोकरीसाठी निवड केली आहे. टी अँड  पी विभागाच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या हातात त्यांच्या अंतिम नोकरीचे नेमणुक पत्र प्राप्त झाले आहे, अशी  माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

          आयएफबी इलेक्ट्रॉनिक्स या गृहोपयोगी उपकरणाच उत्पादन करणाऱ्या  कंपनीने नोकरीसाठी निवड केलेल्या नवोदित अभियंत्यांमध्ये गायत्री धमेंद्र देवरे, साक्षी शशिकांत , संतोश कुमार, गोरक्षनाथ ज्ञानेश्वर इपर  , प्रतिक संजय गायकवाड व शाम  कुमार यांचा समावेश  आहे.

जाहिरात

        सध्या तंत्रज्ञान झपाट्याने  बदलत आहे. नामांकित कंपन्या उत्पादन प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा व मशिनरींचा उपयोग करतात. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अभियंत्यांना कोणते तंत्रज्ञान अभिप्रेत आहे, याचा अभ्यास करून त्या तंत्रज्ञानावर अधिकचा भर देवुन ते विद्यार्थ्यांना शिकवून न त्यावर लेखी  व तोंडी चाचणी घेवुन विद्यार्थ्यांना परीपूर्ण केल्या जाते. तसेच टी अँड पी विभागाकडून कंपनी निहाय मुलाखतींचा सराव करून घेतला जातो. त्यामुळे विद्यार्थी वेगवेगळ्या  कंपन्यांच्या मुलाखतींना सहज सामोरे जातात व यशस्वीही होतात.

जाहिरात

           संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. तर मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर व टी अँड  पी विभाग प्रमुख प्रा. आय. के. सय्यद उपस्थित होते.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी आयएफबी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या पालीटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र. यावेळी प्राचार्य मिरीकर, प्रा.सय्यद व इतर उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे