उच्च शिक्षित प्रगतशील शेतकरी यांचे मरणोत्तर नेत्र व देहदान प्रेरणादायी
मरावे परी नेत्र रुपी उरावे
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २२ जुलै २०२५– मरावे परी नेत्र रुपी उरावे कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील आसाराम शंकरराव करडे यांचे नुकतेच निधन झाले कर्तृत्ववान, दूरदृष्टी संपन्न व समाजभिमुख व्यक्तिमत्त्व सर्वत्र हळहळ व्यक्त होतो असताना त्यांचा जीवनप्रवास हा प्रेरणा, कष्ट, दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकीने परिपूर्ण होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण वारी गाव, माध्यमिक शिक्षण श्रीरामपूर कॉलेज, उच्च शिक्षण फर्ग्युसन कॉलेज, पुणे वकिलीचे शिक्षण लॉ कॉलेज, पुणे येथे पूर्ण झाले.
जाहिरात
शहरात विविध व्यवसाय व नोकरीच्या संधी असतानाही त्यांनी आपल्या मूळ गावाकडे परत येत, शेती क्षेत्रात कार्य करण्याचा निश्चय केला. त्यांनी पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन आधुनिक शेतीची वाट धरत नवीन शेती खरेदी, विहिरींची उभारणी व पाइपलाइन टाकणे, फळबागांची लागवड, आधुनिक दुग्ध व्यवसायाची सुरुवात, ५० वर्षांपूर्वी त्यांनी जिंदाल कंपनीच्या स्प्रिंकलर सेट्सची नगर जिल्ह्याकरिता अधिकृत एजन्सी घेतली आणि ती सिंचन प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. ही बाब त्या काळात अत्यंत दूरदृष्टीची ठरली.जाहिरात
द्राक्षबागेपासून प्रेरणा घेऊन त्यांनी कान्हेगाव येथे राहत्या घराजवळ बेदाण्याचा कारखाना उभारला, ज्यामध्ये पंचक्रोशीतल्या १०० हून अधिक कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. या उपक्रमामध्ये त्यांच्या भावांनी त्यांना खंबीर साथ दिली.जाहिरात
त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटीही समाजासाठी काहीतरी देण्याचीच भावना जपली. मरावे परी नेत्र रुपी उरावे या भावनेने त्यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान करून समाजापुढे जाता जाता देखील आदर्श उभा केला नेत्रदान देहदान व अवयवदान समुपदेशक डॉक्टर अशोक गावित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे नेत्रदान श्री साईनाथ नेत्रपेढी साईबाबा संस्थान, शिर्डी येथे व देहदान प्रवरा मेडिकल ट्रस्ट, लोणी येथे करण्यात आले.जाहिरात
हे कार्य म्हणजे त्यांच्या समाजशीलतेचे अंतिम व सर्वात तेजस्वी उदाहरण ठरते. याप्रसंगी दिलीप करडे. संजय आसाराम करड मुलगी सुनीता गुंड संगीता सरोदे. भाऊ भाऊसाहेब करडे, पांडुरंग करडे, रावसाहेब करडे, बाबासाहेब करडे. प्रकाशराव करडे,त्र्यंबकराव सरोदे, नामदेव जाधव, नवनाथ जाधव. दिनकर काजळे, बंडू भाकरे, रमेश टेके, शांताराम जाधव ,बापूसाहेब टिक्कल,एल के चौधरी, राजूनाना, अशोक आप्पा कैलास काजळे, प्रकाश काजळे. सरपंच कान्हेगाव गणेश सोनवणे उपस्थित होते.