पाणंद रस्ते योजनेतून मतदारसंघासाठी ५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता – आमदार कोल्हे यांनी मानले शासनाचे आभार
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेतून कोपरगाव मतदारसंघासाठी ५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता – आमदार विवेक कोल्हे यांनी मानले शासनाचे आभार
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २४ जुन २०२६-कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत कोपरगाव मतदारसंघासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार विवेक कोल्हे यांनी दिली.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकत्याच काढलेल्या शासन निर्णयानुसार या योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी विविध मतदारसंघांना निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये कोपरगाव मतदारसंघाचाही समावेश करण्यात आला आहे.
जाहिरात
या निधीमुळे मतदारसंघातील अनेक शेत व पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणार असून शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक, कृषी उत्पादनांची बाजारपेठेत ने-आण तसेच ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या रस्त्यांच्या समस्यांवरही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे शेती क्षेत्राला आवश्यक असलेली मूलभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.जाहिरात
आमदार विवेक कोल्हे यांनी या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महसूल मंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सकारात्मक भूमिका घेत असून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी शासनाचे विशेष अभिनंदन केले.जाहिरात
यावेळी आमदार कोल्हे म्हणाले की, कोपरगाव मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. शासनाने दिलेल्या या ५ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेमुळे शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांना मोठी गती मिळणार आहे. ग्रामीण भागातील विकासकामे अधिक वेगाने पूर्ण करून शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.या निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध गावांतील प्राधान्यक्रमाने निवडलेल्या रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार असून त्याचा थेट लाभ हजारो शेतकरी कुटुंबांना होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.