आपला जिल्हा

शिर्डी औद्योगिक वसाहतीत संरक्षण उत्पादन संकुलांचे  संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत उद्घाटन-  पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील 

शिर्डी औद्योगिक वसाहतीत संरक्षण उत्पादन संकुलांचे  संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत उद्घाटन-  पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील 

शिर्डी औद्योगिक वसाहतीत संरक्षण उत्पादन संकुलांचे  संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत उद्घाटन-  पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील 

Shirdi vijay kapse दि १४ मे २०२६पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि ‘मेक इन इंडीया’ या भारताच्या दूरदर्शी संकल्पनांना चालना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी औद्योगिक वसाहती मध्ये ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलांचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत दि.२३ मे २०२६ रोजी होणार असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि निबे गृपचे गणेश निबे यांनी दिली.

जाहिरात

शिर्डी औद्योगिक वसाहती मध्ये निबे गृपच्या माध्यमातून भारतातील खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादनाच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,अत्यावश्यक संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांसाठी प्रगत उत्पादन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिर्डी येथील डिफेन्स क्लस्टर निर्माण होत आहे.

जाहिरात

शिर्डीची भूमी भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संगम आहे.श्री साईबाबांचा श्रध्दा आणि सबुरीचा संदेश आणि दुसरीकडे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अहील्यानगर जिल्हा संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट करून, कार्यान्वित होणार्या प्रकल्पातून तीन हजार रोजगार निर्मिती होईल. यासाठी शिर्डीची निवड केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

जाहिरात

निबे उद्योग समुहाचे गणेश निबे प्रकल्पाची माहीती देताना म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून आमच्या स्टार्टअपला मिळालेली संधी खूप मोठी आहे. शिर्डी येथील प्रकल्पात एक हाजार कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आतापर्यत केली आहे.भविष्यात ही गुंतवणूक अधिक वाढेल.अत्याधुनिक प्रणालींचे डिझाइन, विकास, उत्पादन आणि एकत्रीकरण करणारी भारतातील आघाडीचा निबे गृप असून,शिर्डी येथील प्रकल्पातील बाॅम्ब शेलच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमीपूजन संरक्षण मंत्री राजनाथसिंह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

जाहिरात

शिर्डी येथील प्रकल्प राष्ट्रीय सुरक्षा अर्थिक विकास लघु सूक्ष्म उद्योगाचे सक्षमीकरण रोजागार निर्मीती आणि पर्यावरणीय जबाबदारी आशा एकात्मिक दृष्टिकोनातून कार्यान्वित होणार असून,प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने देशभरातील विद्यार्थी, उदयोन्मुख अभियंते,लघु सूक्ष्म उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योजक यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे गणेश निबे यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे