संजीवनी उद्योग समूह व संजीवनी फार्मर्स फोरमचा शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न
शेतीपूरक व्यवसायांकडे शेतकऱ्यांनी वळावे ही काळाची गरज – युवानेते विवेकभैय्या कोल्हेशेतीपूरक व्यवसायातून महिलांनी क्रांती घडविण्यासाठी सज्ज व्हावे – मा.आ.स्नेहलताताई कोल्हेशेतीपूरक व्यवसायातून प्रगतीच्या मोठ्या संधी – विवेकभैय्या कोल्हे

कोपरगाव विजय कापसे दि ४ जुन २०२५- शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पुरक व्यवसायाकडे वळावे. शेतीपूरक उपक्रम सुरू करून उत्पन्नाचे नवे स्रोत तयार करता येतात. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल, असे मत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केले.

कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्तनिवास क्रमांक दोन येथे संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी फार्मर्स फोरम यांच्या सहकार्याने आयोजित शेतीपूरक व्यवसायातील संधी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रतिमा पूजन मा.आ.स्नेहलताताई कोल्हे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे आणि मत्स्य संस्थेचे उपाध्यक्ष अंबादास पाटोळे आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांच्या हस्ते करण्यात आले.

बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी नितीन ढसाळ, संदीप खेमनर आणि अविनाश जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी संजीवनी ग्रुप हेड न्यू व्हेंचर्स संजीव पवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, “संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शेतकऱ्यांची आर्थिक क्रयशक्ती वाढवण्यासाठी विविध शेतीपूरक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी पुढाकार घ्यावा.”




