संगमनेर

आयुष्यात एक तरी वारी अनुभवावी- रणजीतसिंह देशमुख

आयुष्यात एक तरी वारी अनुभवावी- रणजीतसिंह देशमुख
रणजीतसिंह देशमुख
चेअरमन
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ, संगमनेर

संगमनेर प्रतिनिधी दि १६ जुलै २०२४आषाढी एकादशीच्या वारीचे वारे वाहू लागतात ते साधारण एक महिना आधीपासूनच, जूनचा अखेरचा आठवडा किंवा जुलैचा पहिला आठवडा हा वारीच्या दिनदर्शिकेतील महत्त्वाचा कालावधी. परदेश दौऱ्यावर निघणाऱ्या पर्यटकांसाठी प्रवासाच्या दिवसाच्या आधीचा आठवडा मानसिक उलाघालीचा असतो. सामानाची जमवाजमव, बांधाबुंद, चेकलिस्ट तपासणी सारी लगीन घाई. वारकऱ्यांचं सारं कसं निवांत, पूर्वनियोजित, पण विठुरायाच्या स्वाधीन, दैवाधीन नव्हे, कित्येक शतकांची परंपरा असलेल्या वारीचं सारं काही सेट असतं.मार्ग,मुक्कम,भोजन विश्राम सारं

जाहिरात
मी तसा नियमित वारकरी नाही हे स्पष्ट सांगायला हवं. वारीला जायचं आणि तोंड लपवायचं ही वेळ आपल्यावर यावी.असं कोणत्या भाविकाला वाटेल. मी आस्तिक आहे. देवभीरु आहे. पण देव भोळा किंवा स्वतःला अति धार्मिक मी मानत नाही. श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही. आमच्या संगमनेर येथील प्रवरा नदीच्या काठावर भवानी बागेत (भवानी महाराज) महादेवाचे एक मंदिर आहे. दर सोमवारी महादेवाचे दर्शन हा माझा नियम आहे. विठुरायाच्या पंढरीच्या मार्गावर मी आलो ते २००७ मध्ये बहुदा आषाढातच एका वर्तमानपत्रात छापून आलेला विठ्ठलाचा फोटो मी पाहत होतो. आणि माझी नजर त्या प्रतिमेवर खेळून राहिली. त्या रूपात मला काहीतरी गवसलं. नेमकं काय त्याचं वर्णन करता येणे शक्य नाही. त्याच वेळी पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला. आणि विठू रुखुमाईचे मन भरून दर्शन घेऊन आलो.दुसऱ्या वर्षी जन्मलेल्या माझ्या लेकीचे नाव मग आम्ही रुक्मिणी ठेवलं .

जाहिरात

यंदा २ जुलैला मी, पंधरा वर्षाची लेक रुक्मिणी, पत्नी शरयू, ७० वर्षांची माझी आई आणि ५ – २५ जवळपासची मित्रमंडळी वारीच्या दिंडीत सहभागी झालो. पायीच चालायचे, तरी सहकुटुंब असल्याने व्यवस्थित पूर्ण तयारी केली होती.दिंडी पताका हाती घेऊन चाललेले पंढरीचे पदयात्री पाहिले. त्यांचे कौतुक आणि नवल वाटते. मनात पहिलाच प्रश्न निर्माण झाला खरंच आपल्याला एवढ्या सर्व वस्तूंची गरज आहे का ? उत्तर आमच्या दृष्टिकोतून होय असेच होते. पण विठ्ठल विठ्ठल म्हणा हवे तर पक्का निर्धार असलेले आढळ श्रद्धा असलेले वारकरी पाहिले. आणि त्याचे उत्तर स्पष्टपणे नाही असेच असावे हे उमगले.

जाहिरात

वारकरी नसलो तरी विठू माऊलीचा मी भक्त असल्याने यंदा दिंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही पुणे जिल्ह्याच्या सासवड तालुक्यातील फुरसुंगी येथे एका दिंडीत सहभागी झालो. सासवड पर्यंत १८ किलोमीटर आम्ही त्या दिंडी बरोबर चाललो. ही दिंडी मला वेगळाच अनुभव देऊन गेली. सुमारे साडेसहा तासांच्या त्या प्रवासात ना लेकीने कुठली तक्रार केली, ना सत्तरीतल्या माझ्या माऊलीने, आम्हाला सर्वार्थाने आस लागली होती ती अनेक वर्षापासून चंद्रभागेच्या तीरावर मोठ्या असलेल्या माऊलीची. मी पहिल्यांदा वारीत सहभागी झालो होतो असे नाही. विठू माऊलीचे दर्शन मी अनेकदा घेतलेले आहे. वाढदिवस जितका व्यक्तिगत तितकाच सामूहिक, गेल्या काही वर्षात तो सामुदायिक अधिक झालाय. म्हणूनच दर वाढदिवशी पंढरीला जाण्याचा शिरस्ता आहे.

जाहिरात

आम्ही समूहात चाललो होतो.एका खूप मोठ्या समाजाच्या अविभाज्य घटक असल्याचे मला जाणवत होते. घरी परतलो तर अलौकिक अनुभवाच्या गरुडातून मी बराच वेळ बाहेर पडलो नव्हतो. रात्री शांत निवांत झोप लागली. पण अंतर्मनाचा विचार चक्र चालूच होते. मी आमच्या गटासह विठुरायाचे दर्शन घेऊन परतलो होतो. (मन तृप्त झाले तुझ्या दर्शनाने) दर्शन तर मी घेतच असतो. वाढदिवसाखेरीजही जेव्हा जेव्हा आस लागेल तेव्हा. माझ्यासारख्या प्रत्येक आणि कित्येक भक्तांची वाट पाहत तो तर उभा आहे युगे अठ्ठावीस

जाहिरात

 

वारीत असून मी वारीत नव्हतो. त्या पदयात्रेतील प्रत्येक पाऊल पंढरीच्या वाटेवर पडत होतं. या वाटेवरचे माऊलीचे दर्शन मला घडत होतं. काहीतरी अलौकिक गवसल्याचा आनंद, समाधान, उल्हास प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर होता. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत गोरोबांनी विठ्ठल नाम जपत चिखल तुडवला तसाच वारकरीही चिखल तुडवत चालला होता. प्रत्येक वारकरी एक दुसऱ्याला माऊली संबोधत असे. वारकरी संप्रदायाने सामाजिक आणि सांस्कृतिक समानता सांभाळली आहे. वाढवली आहे. देश व प्रांत यांच्या वेशी ओलांडल्या आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा,गुजरात, मध्य प्रदेश येथूनही वारकरी येतच असतात. भारतातील लोकशाहीचा आत्माच लोक असल्याने राजकीय लोकशाही आधी शतकापूर्वी वारकरी संप्रदायाने सामाजिक आणि धार्मिक लोकशाहीचा पाया घातला असे म्हटल्यास गैर ठरू नये. कित्येक आणवानी होते. पण दिनवणी कोणीही नाही. माऊलीची अनेक विधरुपे होती. विठुरायाला कुठे शहरी युवक, कुठे ग्रामीण, कुठे तरुण, कुठे ९५ वर्षाचा तरुण, २८ युगे प्रतीक्षेत असलेल्या विठू रायाला भेटायला निघाला. टाळ मृदुंग हरी नामाचा गजर, ज्ञानोबा तुकाराम चा गजर, विठ्ठल भक्तांची चंद्रभागातून वाहत होती.

जाहिरात

एक ना अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या विळख्यात सापडलेल्या प्रेमात पडलेल्या आजच्या आधुनिक ,तरुण, चंगळवादी, संस्कृती पासून स्वतः किती सहज दूर ठेवत होता .व्हाट्सअप ,युट्युब, रिल्स, मीन्स, अपडेट्स, नोटिफिकेशन, ब्रेकिंग न्यूज याचे भान विसरून तरुणाई खऱ्या अर्थाने भक्ती भावाच्या विचारधारेवर आलेली दिसत होईल होती. मोबाईलच्या व्यसनावर मात कशी कराल असा कुठलाही व्हिडिओ कुठल्याही चॅनेलवर पाहण्याची गरज येथे संपली जणू असेच दिसत होते.स्ट्रेस, टेन्शन, पमधून सारे वारकरी मुक्त. या सर्वांसाठी एक तरी वारी अनुभवी असेच वाटते.

एकमेका साहाय्य करू ही सहकाराची जाणीव, आपण समाजासाठी आहोत की सामाजिक बांधिलकीची जाण आणि आवश्यक – अनावश्यक याचे भान वारीच्या दिंडीतच येते म्हणून एकदा तरी वारी अनुभवावी.

मानवता, जात ,पात ,धर्मपंथ भाषा, वर्ण,प्रांत प्रदेश यांचे भेद स्वीकारत नाही. मानवता धर्म हाच खरा धर्म अध्यात्म हीच माणसाची खरच गरज आहे हे वारीत प्रत्ययास येते म्हणून वारी अनुभवावी. सामाजिक एकोपा, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि धार्मिक सलोखा, सहिष्णुता याची एकत्रित दर्शन घेण्यासाठी वारी अनुभवावी. सन्मार्गावर चालणारा एकाकी राहत नाही. त्याला सहकारी, समविचारी भेटत जातात आणि तांडा ( कारवा ) तयार होतो हे अनुभवण्यासाठी वारी अनुभवावी एकदा तरी

 
रणजीतसिंह देशमुख
चेअरमन
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ, संगमनेर

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे