लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात राखी बनवणे कार्यशाळा संपन्न
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात राखी बनवणे कार्यशाळा संपन्न
जाहिरात
अहिल्यानगर विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२५– पारंपरिक सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरे केले जात असतात या सणाचा मोठ्या पासून लहानग्या पर्यंत सर्वाना मोठी उत्सुकता लागलेली असते त्यातून वेगवेगळे उपक्रम राबवत सर्वत्र मोठया प्रमाणात सर्व सण साजरे होत असतात अशातच नुकताच तोंडावर येऊन ठेपलेला रक्षाबंधन निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय अहिल्यानगर मध्ये राखी बनवणे कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
जाहिरात
या कार्यशाळाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय छाया काकडे ,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांच्या शुभहस्ते झाले.जाहिरात
विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख अशा हस्तकलांनी युक्त राख्या तयार केल्या होत्या . विशेष म्हणजे या कार्यशाळेतील मुलांचा सहभाग उत्साहवर्धक होता . या राख्यांचे प्रदर्शन देखील विद्यालयात भरवण्यात आले .उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षिका पिसाळ एस.जी यांनी परिश्रम घेतले तर त्यांना लांडगे एस .एस, गंभिरे एस .वाय, सानप एस .के , ज्योती उबाळे व श्रीम थोरात यांचे सहकार्य लाभले.