ग्रामीण पोलिस कोपरगाव

हंडेवाडीच्या युवकाची व्हाट्सअपद्वारे झाली ४ लाखाची फसवणूक

हंडेवाडीच्या युवकाची व्हाट्सअपद्वारे झाली ४ लाखाची फसवणूक

सोशल मीडियाचा होत आहे मोठया प्रमाणात गौरवापर
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १ ऑगस्ट २०२४कष्ट न करता बखळ पैसा कमविण्याच्या नादात अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असून मोबाईल फोन मधील तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करत ऑनलाईन लिंक पाठवत मोबाईल हॅक करत काही सेकंदात आपली जमापुंजी रिकामी करण्याच्या घटना अथवा अश्लील व्हिडिओ कॉल करत युवकांसह चांगल्या प्रतिष्ठित नागरिकांना ब्लॅकमेल करत पैसे उकळण्याच्या घटना  रोजच जगभरात घडत असून असाच एक प्रकार कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी येथील युवकाच्या बाबतीत घडल्याची घटना समोर आली असून तसा गुन्हा देखील कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी येथील रहिवाशी असलेला २५ वर्षीय अक्षय मच्छिंद्रनाथ वाकचौरे या शेतकरी युवकास सोमवार दि २९ जुलै रोजी तो वापरत असलेल्या  मोबाईल मधील ९५०३५९०६४१ या व्हाट्सअपच्या एप्लीकेशन वर एका अज्ञात इसमाने या ९९७५८३२७४६ या व्हाट्सअप नंबरच्या एप्लीकेशन वरून युनियन बँक ऑफ इंडिया या नावाने APK नावाचे मोबाईल ॲप पाठवून त्याद्वारे अक्षय वाकचौरे याचा विश्वास संपादन करत त्याचा कडून त्याचा कार्ड व एटीएम कार्ड संपूर्ण माहिती घेऊन त्याचा मोबाईल हॅक करून त्याद्वारे त्या अज्ञात इसमाने अक्षयच्या बँक खात्यावरून वेगवेगळे ४ व्यवहार करत त्याच्या बँक खात्यातून ३ लाख ९४ हजार ७०० रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना अक्षय वाकचौरे या युवकांसोबत घडली असून अक्षयच्या फिर्यादीनुसार कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये त्या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २७४/२०१४ बी.एन.एस २०२३ चे कलम चे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४) माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम २००० चे कलम ४३ (बी) सह ६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे करत आहे.

जाहिरात
आपण वापरत आसलेल्या मोबाईल फोन मधील वेगवेगळ्या सोशल मिडिया साईट द्वारे अनेक फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे प्रत्येक मोबाईल वापरकत्याने काळजीपूर्वक मोबाईल फोन चा वापर करावा.
संदीप कोळी 
पोलिस निरीक्षक कोपरगाव तालुका ग्रामीण

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे