थोरात महाविद्यालयाचे प्रा. राजेश मंजुळ यांना पीएचडी मिळाल्याबद्दल ॲड. संदीप वर्पे यांनी केला सन्मान
थोरात महाविद्यालयाचे प्रा. राजेश मंजुळ यांना पीएचडी मिळाल्याबद्दल ॲड. संदीप वर्पे यांनी केला सन्मान
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील प्रा. राजेश मंजुळ यांना पीएचडी मिळाल्याबद्दल ॲड. संदीप वर्पे यांनी केला सन्मान
कोपरगाव विजय कापसे दि १ जुलै २०२४– सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक राजेश किसनराव मंजुळ यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने रसायनशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान केली आहे. ‘ॲप्लिकेशन ऑफ ग्रीन मेथड इन सिंथेसिस ऑफ बायोॲक्टिव्ह हेट्रोसायक्लिक कम्पाउंड’ या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला असून या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते ॲड.संदीप वर्पे यांनी सत्कार करत दिल्या शुभेच्छा.या प्रसंगी बापू वढणे उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विभागाच्या रसायनशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले. हरीत रसायनशास्त्राच्या उपयोजनातून पर्यावरण स्नेही रासायनिक संयुगाच्या निर्मितीला प्राध्यापक मंजुळ यांच्या संशोधनाद्वारे गती मिळणार आहे.
त्यांचे शिक्षण MSc, SET, NET, MPhil, PGDGC शिक्षण पूर्ण केले आहे.
राज्याचे लोकनेते मा. महसूल मंत्री, आ.बाळासाहेब थोरात साहेब, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.सुधीर तांबेसाहेब, आ. सत्यजितदादा तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, सचिव लक्ष्मणराव कुटे, सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, प्राचार्य डी.डी.पाटील, विभागप्रमुख डॉ. शोभा बोह्राडे आदींनी यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे..