आपला जिल्हा

संवत्सर येथील पुलाचे काम जलद गतीने पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी वाहतूक सुरु करा- आ.आशुतोष काळे

संवत्सर येथील पुलाचे काम जलद गतीने पूर्ण करून
पावसाळ्यापूर्वी वाहतूक सुरु करा- आ.आशुतोष काळे

संवत्सर येथील पुलाचे काम जलद गतीने पूर्ण करून
पावसाळ्यापूर्वी वाहतूक सुरु करा- आ.आशुतोष काळे

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १२ मे २०२६राज्यातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील जुन्या मुंबई-नागपूर (एन.एच.७५२आय) महामार्गावरील संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम अतिशय धीम्यागतीने सुरु आहे. पावसाळा तोंडावर येवून ठेपला असतांना हे काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु सुरु असलेले दुरुस्तीचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून या मुंबई-नागपूर महामार्गाच्या लगत असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत.

जाहिरात

कोपरगाव शहराला जोडणारा तालुक्याच्या पूर्व भागातील हा अतिशय महत्वाचा मार्ग बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचे कामाला गती देवून पावसाळयापूर्वी पुलावरून वाहतूक सुरु करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग (एन.एच.७५२ आय) च्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला जुना मुंबई-नागपूर (एन.एच.७५२ आय) महामार्गावरील गोदावरी नदीवरील बांधण्यात आलेल्या संवत्सर येथील पुलाला मध्यभागी भगदाड पडल्यामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी पुलावरून होणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांची दिल्ली येथे त्यांच्या शासकीय निवास्थानी भेट घेऊन त्यांच्याकडे या पुलाच्या दुरुस्तीसाठी विशेष निधीची मागणी केली होती. त्या मागणीची तातडीने दखल घेवून मंत्री ना.नितीन गडकरी यांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी दिलेल्या निधीतून या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे.

जाहिरात

त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी कधी खुला होईल याकडे वाहन चालकांचे व पूर्व भागातील नागरीकांचे लक्ष लागले आहे. कारण पावसाळा सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असून पाऊस सुरु झाल्यानंतर दुरुस्तीचे काम करता येणार नाही.त्यामुळे सुरु असलेल्या कामाचा वेग वाढवावा व पावसाळा सुरु होण्यापूर्वी या महामार्गावरील वाहतूक सुरु करावी. तसेच या महामार्गाच्या लगत पावसाचे पाणी वाहून नेणारे अनेक नैसर्गिक स्त्रोत बंद आहेत त्यामुळे पावसाचे पाणी साचून रस्त्याचे नुकसान होवू शकते. त्यासाठी हे नैसर्गिक स्त्रोत खुले करून द्या जेणेकरून पाणी साचून न राहता नैसर्गिक पद्धतीने पाणी वाहून जाईल.अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग (एन.एच.७५२ आय) च्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे