महंत रामगिरीजी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाला अथांग जनसागराची लक्षणीय उपस्थिती
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंचे कार्य राज्याच्या स्मरणांत-आ.प्रा.राम शिंदे
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व ९५ व्या जयंती निमीत्त येथील तहसील कचेरी ज्ञानेश्वरनगर मैदानावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने महंत रामगिरी महाराज यांच्या रसाळ वाणीतून संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यांत आले होते त्याची सांगता शनिवारी (दि. २३ मार्च) त्यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली त्याप्रसंगी आमदार प्रा. राम शिंदे बोलत होते.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, सप्ताहभर श्रीमद भागवत कथा श्रवणासाठी भाविकांनी उच्चांकी गर्दीने सहभाग दिला हा आम्हा सर्व कोल्हे कुटुंबियांसाठी परमानंद आहे. मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा स्व. शंकरराव कोल्हे यांनी दिलेला वसा समर्थपणे पुढे चालवत आहोत.महिला सबलीकरणांतून बचत गटाच्या माध्यमांतून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात साली., कोरोना महामारीत विवेक कोल्हे, व त्यांच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानने केलेले कार्य सामाजिक कार्याची देण आहे. स्वामी सहजानंदभारती पासून थेट नारायणगिरी महाराजांपर्यंत सर्वच घटकांचा सहवास माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना लाभला हा सर्वांसाठी अमुल्य ठेवा आहे.

महंत रामगिरी महाराज काल्याचे कीर्तनात बोलताना म्हणाले की, जेंव्हा आपल्यातील अहंकाररूपी गोष्टींचा त्याग होतो तेंव्हाच परमात्मा मिठी मारत असतो. श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यासह केलेला काला ब्रम्हदेव, इंद्रदेव आदींना त्याचे आकर्षण होते. दुसऱ्यांना आनंद देतो तो नंद. परमार्थ हाच उद्देश ठेऊन कार्य करा त्यात स्वतः बरोबर समाजाचाही उत्कर्ष आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या ९३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरगांवी एप्रिल २०२२ मध्ये श्रीमदभागवत कथेचे आयोजन केले होते मात्र, त्याच्या आतच त्यांचे महानिर्वाण झाले त्यांची इच्छा नातू विवेकभैय्या कोल्हे यांनी पूर्ण केली निश्चितच त्यांच्या आत्म्याला समाधान लाभेल.कर्तृत्ववान आजोबांचा आदर्श विवेकशिल नातू म्हणून विवेकभैय्या कोल्हे यांनी वेगळा ठसा उमटविला आहे.अतिशय देखणा सोहळा घडवून आणला. कोपरगाव शहरात प्रथमच इतक्या मोठ्या उपस्थितीत होणारी श्रीमद् भागवत कथा आयोजित केल्याबद्दल महाराजांनी कौतुक केले.




अतिशय भव्य दिव्य प्रमाणात सात दिवस श्रीमद भागवत कथा पार पडली. या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी रोज उपस्थिती दर्शविली त्याचा उच्चांक काल्याच्या कीर्तनात दिसून आला.तहसील कार्यालयाचे शेजारील दोन्ही मैदान भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरले त्याच वेळी मैदान अपुरे पडल्याने परिसरात हजारोंची गर्दी उभी होती असे चित्र कोपरगाव शहरात प्रथमच बघून अनेकांच्या तोंडी कोल्हे कुटुंबाच्या वतीने अध्यात्मिक विचार जोपासून केलेल्या आयोजनाचे कौतुक होते आहे.

तालुक्यातील हजारहून अधिक वारकरी भजनी मंडळ हजर होते त्यांचा भाविकांना असणारा भजन निनाद जागेवर अनुभवण्याचे भाग्य लाभले यावेळी सर्वांचा विशेष सन्मान करण्यात आला
