लोकनेते बाळासाहेब थोरात २९ महानगरपालिकांसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक
लोकनेते बाळासाहेब थोरात २९ महानगरपालिकांसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक
संगमनेर विजय कापसे दि २४ डिसेंबर २०२५-राज्यभरात होत असलेल्या 29 महानगरपालिकांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून यामध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, मा. क्रिकेट कर्णधार तथा मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांच्यासह 40 जणांचा समावेश केला आहे.जाहिरात
राज्यामध्ये नुकत्याच नगरपरिषद व नगरपालिकांच्या निवडणुका संपन्न झाल्या यामध्ये काँग्रेस पक्षाने चांगले यश मिळवले असून आगामी होत असलेल्या 29 महानगरपालिकांसाठी काँग्रेसने आपले 40 स्टार प्रचारक मैदानात उतरवण्याचे निश्चित केले आहे.जाहिरात
काँग्रेसचे निष्ठावंत सैनिक तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यभर मोठा संपर्क निर्माण केला असून राज्यातील सर्व विभागांमध्ये त्यांचा मोठा आदर होत आहे. सर्वसामान्यांची थेट संपर्क,स्वच्छ प्रतिमा, कार्यक्षम नेतृत्व यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील ते नेतृत्व आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद याचबरोबर महसूल व कृषी विभागासारखे महत्त्वाची खाते सहा वर्षे सांभाळली आहेत.शालेय शिक्षण, जलसंधारण, रोजगार हमी योजना, खार जमीन अशा महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आणि काँग्रेस पक्षाचे गटनेते पद सांभाळले आहे. याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले असून नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत संगमनेर नगरपालिकेमध्ये मोठे घवघवीत यश मिळाले आहेत.
जाहिरात
याचबरोबर महाविकास आघाडी निर्माण करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा असून काँग्रेसच्या अडचणीच्या काळामध्ये बाजीप्रभू म्हणून त्यांनी खिंड लढवत काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले होते. काँग्रेस विचारांचे पाईक आणि गांधी कुटुंबियांबरोबर एकनिष्ठता असलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यघटना आणि लोकशाही यांना मानणाऱ्या समविचारी पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांचे चांगले संबंध असून या सर्व पक्षांची मोट बांधण्यामध्ये त्यांचा कायम पुढाकार राहिला आहे.
मुंबई सह राज्यामध्ये 29 महानगरपालिकाची निवडणूक होत असून या निवडणुकीकरता काँग्रेस पक्षाकडून प्रभारी रमेश चेन्निथला,लोकनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, मा.कसोटी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, कन्हैया कुमार, माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट, विजय वडेट्टीवार खासदार छत्रपती शाहू महाराज, बंटी पाटील, मुकुल वासनिक यांच्यासह 40 जणांचा सहभाग आहे.