आपला जिल्हा

करंजी येथे खासदार वाकचौरे यांच्या निधीमधील वीरभद्र सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न

करंजी येथे खासदार वाकचौरे यांच्या निधीमधील वीरभद्र सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न

करंजी येथे खासदार वाकचौरे यांच्या निधीमधील वीरभद्र सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २५ एप्रिल २०२५शिर्डी लोकसभा मतदार संघाचे  खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील जागृत देवस्थान श्री विरभद्र महाराज मंदिरासमोरील ७ लाख रुपयेच्या सभामंडपाचे भूमिपूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात गावचे लोकनियुक्त सरपंच रविंद्र आगवन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि २४ एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात युवा नेते रोहित भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभहस्ते हस्ते संपन्न झाला.

जाहिरात

सदरचे सविस्तर वृत्त असे की, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या प्रथम कालखंडात सभामंडप आणि देवस्थानांना मोठा निधी दिला होता. शिवाय सरकारकडून मिळणारे आपले मानधनही धार्मिक आस्थापना यांच्यावर खर्च केले होते. त्यांची मतदारांनी जाणीव ठेवून मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विश्वास टाकून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.

जाहिरात

त्यांनी आपला स्थानिक विकास निधी पुन्हा एकदा देण्यास प्रारंभ केला आहे. त्याची सुरुवात कोपरगाव तालुक्यातील करंजी येथून केली या प्रसंगी शिवसेना ग्राहक संरक्षण विभागाचे मुकुंद सिनगर, पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आगवण, उपसरपंच शिवाजी जाधव, जेष्ठ नेते लक्ष्मण भिंगारे, सेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णा आहिरे, युवासेना उपतालुकाप्रमुख चंदू भिंगारे, शंकर सिनगर यांच्यासह विरभद्र यात्रा कमिटी सदस्य व प्रमुख ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

दरम्यान त्यात सन २०२४-२५ या वर्षातील स्थानिक विकास निधी अंतर्गत पहिल्या टप्यात कोपरगाव तालुक्यातील एकूण १७ गावे मिळून ७२ लक्ष रुपये, केंद्र सरकारच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ५ गावे मिळून ५० लक्ष रुपये आणि जिल्हा विकास निधी अंतर्गत ७ गावे मिळून ४२ लक्ष रुपये निधी मंजूर करून दिल्याबद्दल खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी स्वागत करत आभार व्यक्त केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे