आपला जिल्हा

कार्यकर्त्यांची आढळनिष्ठा : आमचा पक्ष बाळासाहेब थोरात

कार्यकर्त्यांची आढळनिष्ठा : आमचा पक्ष बाळासाहेब थोरात

पठार भागामध्ये सामान्य जनतेची हाक

तरुणाईच्या स्टेटसवर, सोशल मीडियात चर्चा

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १३ जुलै २०२५लोकनेते हे निवडणुकीपुरते मर्यादित नसतात ते जनतेच्या हृदयात असतात. यशवंतराव चव्हाण यांची परंपरा जोपासणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. त्यांच्या प्रती जनतेमध्ये मोठी कृतज्ञता असून आमची निष्ठा आमचा पक्ष फक्त माजी मंत्री बाळासाहेब थोरात आहेत असे पठार भागातील सर्व कार्यकर्ते अभिमानाने सांगत आहेत.

जाहिरात

घारगाव येथे अजय फटांगरे यांची काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली यावेळी सत्कार कार्यक्रमात अनेक नागरिकांनी व युवकांनी आपल्या भावना मांडल्या.यावेळी अरुण वाघ, नाना शेठ भालके, संदीप नाईकवाडी, गणेश आहेर, सर्जेराव ढमढेरे,राजवर्धन पिसाळ, सुरेश आहेर, गणेश लेंडे, बाळासाहेब ढोले, अक्षय ढोकरे ,सचिन गाडेकर,उमेश आहेर, ज्ञानेश्वर आहेर, आमिर शेख, जयसिंग आहेर आदींसह पठार भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

जेष्ठ कार्यकर्ते सर्जेराव पाटील ढमढेरे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने जनतेसाठी काम केले आहे. आज संगमनेर हे नाव महाराष्ट्रात त्यांच्यामुळे आहे. सत्ता येते आणि जाते.सत्तेच्या मागे पळायचे नसते. महाराष्ट्राची परंपरा आहे ती निष्ठावंतांच्या पाठीशी राहायचे.आमचा पक्ष आमची निष्ठा फक्त बाळासाहेब थोरात आहे. कुणी कितीही आले कुणी कितीही बोलले तरी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत कारण उद्याचा महाराष्ट्र त्यांची वाट पाहतो आहे. अशी भावना मांडताना त्यांना गहिवरून आले.

जाहिरात

तर अजय फटांगरे म्हणाले की, युवा काँग्रेस पासून काम करताना जिल्हा परिषदेमध्ये माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मला मोठी संधी दिली आणि त्या माध्यमातून विकासाच्या अनेक योजना बोटा गटामध्ये राबवले आहेत. विधानसभा निवडणुकीत धार्मिक मुद्दे पुढे आले. विष पेरले गेले परंतु आता जनतेला सत्य कळाले आहे. धर्माचे राजकारण करून विकास होत नाही सर्वांना सोबत घेतले पाहिजे. या पुढील काळात गाव तेथे शाखा उभारून काँग्रेस पक्ष अधिक ताकदीने उभा करू असे ते म्हणाले. याप्रसंगी विविध युवक कार्यकर्त्यांची भाषणे झाली.

 
सोशल मीडियावर धूम : आमचा पक्ष फक्त बाळासाहेब थोरात या रील ची धूम

सत्ता येते आणि जाते मात्र महाराष्ट्रातून नेते उभे करणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी सामान्य जनता असल्याची कार्यकर्त्याची भावना आणि साहेबांची छबी युवकांच्या व कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावर जोरदार होती.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे