आपला जिल्हा

शिर्डी विधानसभेतील मतदान यंत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

शिर्डी विधानसभेतील मतदान यंत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

शिर्डी विधानसभेतील मतदान यंत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

शिर्डी प्रतिनिधी दि ७ मे २०२४शिर्डी विधानसभा मतदारसंघातील २७० मतदान केंद्रासाठीची मतदान यंत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेला आज, दि.६ मे रोजी सुरूवात झाली. मतदान यंत्रे तयार करण्याचे हे काम निवडणूक आयोगाच्या मागदर्शक सूचनानुसार अतिशय काटेकोरपणे करण्यात येत आहे.

जाहिरात

यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात वीस उमेदवार निवडणूक लढत असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्राबरोबर प्रत्येकी दोन इलेक्ट्रॉनिक्स बॅलेट पेपर वापरावे लागणार आहेत. शिर्डी लोकसभा मतदार संघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या ६ विधानसभा मतदारसंघात १७०८ मतदान केंद्र आहेत. या विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्राची जुळणी/मतदान यंत्रे तयार करण्याचे काम मागील दोन दिवसापासून त्या त्या विधानसभा मतदानसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये सुरू आहे.

जाहिरात

शिर्डी विधानसभा मतदारसंघात २७० मतदान केंद्र आहेत. यासाठी मतदान यंत्रे जुळणी करण्याचे राहाता तालुका प्रशासकीय भवन येथे सुरू झाले. ही प्रक्रीया दोन दिवस चालणार आहे. यासाठी २१ टेबलवर प्रत्येकी ६ अधिकारी/कर्मचारी असे एकूण १०६ अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहिरात

निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांच्या देखरेखाली ही मतदान यंत्रे तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. यावेळी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोर मोरे, निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील, शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे आदी अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे