देशाचा सुरमयी आवाज हरपला – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

देशाचा सुरमयी आवाज हरपला – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
देशाचा सुरमयी आवाज हरपला – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

Sangmner vijay kapse दि १२ एप्रिल २०२६– गेली आठ दशके भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या दैवी आवाजाने प्रत्येकाला खेळवून ठेवणाऱ्या आशाताई भोसले यांनी 12000 हून अधिक गाणी गायली. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली असून देशाचा सुरमयी आवाज हरपला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
गाणसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, पंडित उदयनाथ मंगेशकर या सर्वांनी भारतीय संगीतासाठी मोठे योगदान दिले. आशाताईंनी आठ दशकावून अधिक काळ भारतीय संगीताची सेवा केली असून 20 पेक्षा जास्त भाषांमधून सुमारे 12500 गीतांचे गायन केले आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण,दादासाहेब फाळके या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. देशातील प्रत्येकाची सकाळ व संध्याकाळ आशाताईंच्या गाण्याने होत होती. शास्त्रीय संगीत ते आधुनिक संगीतामधील सर्व गाणी त्यांनी गायली.

2014 मध्ये संगमनेरला त्यांनी लाईव्ह कॉन्सर्ट मोठ्या आनंदाने केला. यावेळी झालेली त्यांची प्रकट मुलाखत प्रत्येकाच्या स्मरणात आहे. संगमनेरकरांवर त्यांनी कायम प्रेम केले असून त्यांच्या निधनाने देशाच्या संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून देशाचा सुरमई आवाज हरपल्या असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

भारताने आपला प्रिय आवाज गमावला – आमदार सत्यजित तांबे
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, भारताने आज आपला सर्वात प्रिय आवाज गमावला आहे. एक असा आवाज ज्याने पिढ्यान पिढ्या लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. प्रत्येक पिढीतील नागरिकांसाठी आशाताईंनी गायलेले विविध गीतेही आनंद देणारी आहेत. त्यांच्या निधनाने देशाच्या संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, मागील आठ दशके संगीत आणि आशाताईंचे गीते हे एक सूत्र होते. नव्या पिढीमध्ये सुद्धा अशा ताईंनी अनेक चांगली गीते देशाला दिली. भजन ते पॉप गीते हा त्यांचा प्रवास नव्या गायकांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पुन्हा आशाताई होणे नाही – डॉ.जयश्रीताई थोरात
भजन सुगम संगीत शास्त्रीय संगीत अशा विविध गीतांमधून आशाताईंनी लाखो रसिकांना नेहमी खेळवून ठेवले संगीताबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले 12000 पेक्षा जास्त गाणी गाणाऱ्या आशाताई पुन्हा होणे नाही अशी भावना युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांनी व्यक्त केली आहे.



