आपला जिल्हा

स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले आणि संगमनेरचे जिव्हाळ्याचे नाते; प्रकट मुलाखती मधून उलगडल्या अनेक आठवणी

स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले आणि संगमनेरचे जिव्हाळ्याचे नाते; प्रकट मुलाखती मधून उलगडल्या अनेक आठवणी
स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले आणि संगमनेरचे जिव्हाळ्याचे नाते; प्रकट मुलाखती मधून उलगडल्या अनेक आठवणी
Sangmner vijay kapse दि १२ एप्रिल २०२६अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर व तालुक्याला मोठी सांस्कृतिक समृद्ध परंपरा लाभली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी ही वैभवशाली परंपरा जपताना सातत्याने विविध संत आणि कलावंतांना संगमनेरमध्ये बोलावून त्यांचा सन्मान केला आहे. 2014 मध्ये पद्मभूषण स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचा संगमनेर मध्ये झालेला लाखोंच्या उपस्थितीतील कार्यक्रम आजही जिल्ह्यातील सर्वांच्या आठवणीत आहे. संगमनेर आणि आशाताई यांचे कायम जिव्हाळ्याचे नाते या निमित्ताने अधिक वृद्धिंगत झाले.

जाहिरात
जाणता राजा मैदान येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त तत्कालीन महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून आशा भोसले लाईव्ह कॉन्सर्ट 2014 मध्ये संपन्न झाला होता.

जाहिरात

या कार्यक्रमांमध्ये स्वतःआशाताईंनी मराठी हिंदी अशी विविध गाणी गायली.सुमारे लाखभर प्रेक्षकांची उपस्थिती, भव्य दिव्य स्टेज, अत्याधुनिक व दर्जेदार आसन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, लाईट एलईडी अशा सर्व सुविधांमध्ये झालेला आशा कॉन्सर्ट 2014 हा सर्वांच्या लक्षात राहिला. यावेळी आशा भोसले यांनी अमृत उद्योग समूहाला भेट देऊन विविध सहकारी संस्थांची पाहणी केली. यावेळी तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉ.सुधीर तांब,सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते आशा भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुधीर गाडगीळ यांनी आशाताई भोसले यांची प्रकट मुलाखत घेतली.

जाहिरात

यावेळी आशा भोसले म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जोपासणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेतृत्व आहे. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी संगमनेर तालुक्याचा विकास केला आहे. याचबरोबर राज्यामध्ये अत्यंत स्वच्छ व पारदर्शकपणे चांगले काम करणारे ते मंत्री आहेत. कायम जनतेमध्ये राहणारा सुस्वाभावी असणारा हा नेता नक्कीच महाराष्ट्राचे उज्वल भविष्य ठरणार आहे. याचबरोबर बाळासाहेब तुम्हाला महाराष्ट्रात खूप मोठे काम करायचे आहे असा आशीर्वाद त्यांनी दिला.

जानेवारी 2023 मध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा नागपूर येथे अपघात होऊन खांद्याला दुखापत झाली होती. यावेळी आशाताई यांनी अगदी आस्थेवाईकपणे दवाखान्यामध्ये जाऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांची चौकशी केली. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मंगेशकर कुटुंबीयांची भेट घेऊन सर्वांचे सांत्वन केले यावेळी आशा भोसले ,उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते.

त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या जयंती महोत्सवाच्या वेळी सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये आशाताईंनी फोन करून लोकनेते बाळासाहेब थोरात यांची चौकशी करत संगमनेरकरांवरती प्रेम व्यक्त केले. व उपस्थित सर्व संगमनेरकरांना शुभेच्छा दिल्या.

वयाच्या 92 व्या वर्षी आशाताईंनी अखेरचा श्वास घेतला आणि संगमनेरकरांसाठी ही अत्यंत दुःखद घटना घडली. अनेक आठवणी संगमनेरकरांच्या पद्मभूषण स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या समवेत असल्याने जिव्हाळ्याचे नाते कायम राहिले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे