आपला जिल्हा

गौतम पॉलिटेक्निकच्या ११८ विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्ती

गौतम पॉलिटेक्निकच्या ११८ विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्ती

गौतम पॉलिटेक्निकच्या ११८ विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्ती

Kopargaon vijay kapse दि १२ एप्रिल २०२६ :ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली गुणवत्ता ही एखाद्या खाणीतल्या हिर्‍यासारखी अमूल्य असते परंतु योग्य संधी आणि आधुनिक प्रशिक्षणाच्या अभावी अनेकदा अज्ञात राहते. मात्र जेव्हा या गुणांना योग्य दिशा, सक्षम मार्गदर्शन आणि अत्याधुनिक शिक्षणाची जोड मिळते, तेव्हा हेच विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाने यशाचे नवे शिखर गाठतात हे कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले असून आहे. या संस्थेतील तब्बल ११८ विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच या विद्यार्थ्यांच्या हाती नियुक्तीपत्रे सुपूर्द करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य वासिम शेख यांनी दिली आहे.

जाहिरात

टाटा मोटर्ससह बड्या कंपन्यांचा समावेश असलेल्या या मेगा प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने बॅाश चासिस प्रायव्हेट लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड, किर्लोस्कर न्युमॅटिक्स लिमिटेड, जॉन डिअर ट्रॅक्टर्स, धूत ट्रान्समिशन यांसारख्या जागतिक स्तरावर नावाजलेल्या कंपन्यांमध्ये या ११८ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटने ज्ञान, कौशल्य आणि संस्कार यांचा सुंदर संगम साधत विद्यार्थ्यांच्या आयुष्याला यशाची नवी दिशा देत आहे. ११८ विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच नोकरीच्या संधी उपलब्ध होणे हे विद्यार्थ्यांच्या चिकाटी, मेहनत आणि जिद्दीने केलेल्या कष्टांचे फळ आणि संस्थेच्या दर्जेदार शिक्षणपद्धतीचे तेजस्वी प्रतिबिंब आहे.

जाहिरात

 प्रगत वर्कशॉप आणि मार्गदर्शनाची जोड या यशाबद्दल माहिती देताना प्राचार्य प्रा. वासीम शेख आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. कैलास भोसले यांनी सांगितले कीमहाविद्यालयाचा निसर्गरम्य परिसर आणि तेथील अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त वर्कशॉप विभागसुसज्ज प्रयोगशाळा यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ इंजिनिअरिंगचे शिक्षणच दिले जात नाहीतर त्यांना उद्योगांच्या गरजेनुसार तयार केले जाते. याच मेहनतीचे फळ म्हणून आज येथील विद्यार्थी शासकीय नोकरीसह मोठ्या खासगी कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळेविश्वस्त आमदार आशुतोष काळेव्हा.चेअरमन छबुराव आव्हाडसचिव सौ.चैतालीताई काळेइन्स्पेक्टर प्रा.नारायण बारे तसेच संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढे व सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

नोकरीसाठी निवड झालेल्या ११८ विद्यार्थ्यांसमवेत संस्थेचे विश्वस्त आमदार आशुतोष काळे, इन्स्पेक्टर प्रा.नारायण बारे, प्राचार्य वासिम शेख.

 

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देऊन त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवणे हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या ११८ विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच मिळवलेली नोकरी हे त्यांच्या मेहनतीचे व संस्थेने दिलेल्या दर्जेदार शिक्षणाची, योग्य मार्गदर्शनाची आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची साक्ष आहे.आपल्या पालकांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी  विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले हि यशोगाथा इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आहे. पुढील काळातही अधिकाधिक विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवण्याचा संस्थेचा प्रयत्न कायम राहील.

– चैताली काळे (सचिव)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे