आपला जिल्हा

महात्‍मा फुले यांच्‍या जयंतीचे व्दिशताब्‍दी वर्ष हे  सामाजिक समता व समरसता वर्ष म्‍हणून साजरे होणार – ना. विखे पाटील

 महात्‍मा फुले यांच्‍या जयंतीचे व्दिशताब्‍दी वर्ष हे  सामाजिक समता व समरसता वर्ष म्‍हणून साजरे होणार – ना. विखे पाटील

महात्‍मा फुले यांच्‍या जयंतीचे व्दिशताब्‍दी वर्ष हे  सामाजिक समता व समरसता वर्ष म्‍हणून साजरे होणार – ना. विखे पाटील

जाहिरात

Loni vijay kapse दि ११ एप्रिल २०२६क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या जयंतीचे व्दिशताब्‍दी वर्ष हे राज्य सरकारने सामाजिक समता व समरसता वर्ष म्‍हणून साजरे करण्‍याचा निर्णय केला आहे. महात्‍मा फुलेंच्‍या जयंतीचे व्दिशताब्‍दी वर्ष साजरे होणे सर्वांसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. सामाजिक परिवर्तनासाठी त्‍यांच्‍या विचारांची आज नितांत गरज आहे. शिक्षणाचा वसा आणि समानतेचा त्‍यांनी दिलेला विचार कृतीत आणण्‍यासाठी आपल्‍या सर्वांना कटीबध्‍द होवून काम करावे लागेल असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

जाहिरात

       क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या जयंती निमित्‍ताने मंत्री विखे पाटील यांनी लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात प्रमिमा पुजन करुन, अभिवादन केले. याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या जयंतीचे २०० वे वर्ष आपण या वर्षी साजरे करीत आहोत. सर्वांच्‍याच दृष्‍टीने ऐतिहासिक आणि  अभिमानाचा असा क्षण असल्‍याचे सांगून राज्‍य सरकारने सामाजिक समता आणि समरसता वर्ष साजरे करण्‍याचा घेतला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

जाहिरात

       महात्‍मा फुले यांचे जीवन हे समाजाप्रती समर्पित झालेले होते. शिक्षणाचे महत्‍व ओळखून त्‍यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाच्‍या दिलेल्‍या संधीमुळे स्त्री शिक्षणाचा पाया मजबुत झाला. त्‍यांचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादीत नव्‍हते तर, समाजातील प्रत्‍येक घटकासाठी त्‍यांचा संघर्ष होता. शेतक-यांच्‍या प्रश्‍नांसाठी त्‍यांनी आसुड ओढून शोषणा विरुध्‍द आवाज उठविला. समाजातील दिन, दलीत आणि वंचित घटकांसाठी न्‍याय हक्‍कांचा संघर्ष केला. पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी  स्‍वत: घरातील हौद खुला करुन, त्‍यांनी समानतेचा संदेश आपल्‍या कृतीतून दिला.

जाहिरात

       समाजामध्‍ये आजही अंधश्रध्‍देमुळे फसवणूक होणा-यांची संख्‍या  मोठी आहे. या विरोधातही त्‍यांची काही प्रखर मत त्‍यांनी मांडून समाजाला त्‍यापासून दुर करण्‍याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला. शिक्षणा बरोबरच समाजातील विषमता दुर करण्‍यासाठी त्‍यांनी केलेल्‍या  प्रयत्‍नांचा वारसा पुढे घेवून आपल्‍या सर्वांना जावे लागेल अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे