आपला जिल्हा

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यात ११०० वटवृक्षांचे रोपण; वटसावित्री पौर्णिमेनिमित्त दंडकारण्य अभियानातून उपक्रम

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यात ११०० वटवृक्षांचे रोपण; वटसावित्री पौर्णिमेनिमित्त दंडकारण्य अभियानातून उपक्रम
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यात ११०० वटवृक्षांचे रोपण; वटसावित्री पौर्णिमेनिमित्त दंडकारण्य अभियानातून उपक्रम
जाहिरात

Sangmner vijay kapse दि २९ जुन २०२६लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संगमनेर तालुक्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 1100 वटवृक्षाचे रोपण करण्यात आले असून वटवृक्षासह सर्व देव वृक्ष हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने या सर्व वृक्षांचे नागरिकांनी संवर्धन करावे असे आवाहन मा. नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी केले आहे. तर निरोगी जीवन व ग्लोबल वार्मिंग च्या समस्येवर मात करण्यासाठी वृक्ष संगोपन हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी म्हटले आहे.

जाहिरात
दंडकारण्य अभियानांतर्गत तालुक्यातील विविध ठिकाणी वटवृक्षांचे रोपण व पूजन करण्यात आले.  खांडगाव येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात दुर्गा तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्री थोरात उपस्थित होत्या यावेळी  अर्चना बालोडे, कमल आरगडे ,  लक्ष्मी गुंजाळ,  वंदना गुंजाळ , अरुणा गुंजाळ, संगीता गुंजाळ ,शाहिदा शेख , सुरेखा खरे, आशा सिनारे यांच्यासह गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या. वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर वटवृक्षांचे रोपण करण्यात आले.

जाहिरात

याप्रसंगी दुर्गा तांबे म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाचा तालुक्यात मोठा विस्तार झाला आहे. यामध्ये नागरिकांचाही मोठा सहभाग आहे. वटसावित्री पौर्णिमेला भारतीय परंपरेत मोठे स्थान असून यानिमित्त देव वृक्षांची आपण पूजा करतो. हे वृक्ष सर्वाधिक ऑक्सिजन देणारी आहेत. दंडकारण्य अभियानाअंतर्गत आपण प्रत्येक गावात  वटवृक्षांचे रोपन करतो. यावर्षीही आपण 1100 वटवृक्षांचे रोपन केले आहे. तालुक्यातील महिला पदाधिकारी यांनी प्रत्येकी 10 याप्रमाणे गावांत वटवृक्षांचे रोपन केले आहे. पुढील पिढ्यांसाठी आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासू नये याकरता सर्वांनी वृक्षांचे रोपण ,संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये पिंपळ, वड ,उंबर ,आंबा, कडूनिंब, चिंच या वृक्षांचे रोपण व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, निसर्ग आणि पर्यावरण प्रत्येकाने जपले पाहिजे. कोरोना संकटात प्रत्येकाला ऑक्सिजनचे महत्त्व कळाले परंतु काळ बदलला आणि माणसं विसरली. उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्णता निर्माण झाली. पावसाळा सुरू होऊ नये पाऊस अद्याप चांगला झालेला नाही. पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे या आपत्ती आल्या आहेत. या समस्या टाळण्यासाठी पर्यावरण रक्षण अत्यंत महत्त्वाची आहे याकरता प्रत्येकाने या पावसाळ्यामध्ये किमान दोन झाडे लावून त्याची संगोपन केले पाहिजे. ते तुमच्या जीवनाचे मोठे भांडवल ठरणार आहे. निरोगी जीवनासाठी प्रत्येकाला ऑक्सिजन सह चांगले पर्यावरण गरजेचे आहे. आहार आणि व्यायाम ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असून प्रत्येकाने निसर्ग जपा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपस्थित महिलांनी निसर्गाची गाणी गात वटपौर्णिमा साजरी केली. याप्रसंगी गावातील व परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

खेळ पैठणीचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

खंडेश्वर मंगल कार्यालयात एकविरा फाउंडेशनच्या वतीने  गोकुळ राहणे व सौ वंदना राहणे निर्मित खेळ पैठणीचा हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात सुमारे 400 महिलांनी सहभाग घेतला. पारंपारिक वेशभूषा करत अगदी नटून थटून महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. संगीत खुर्ची ,विविध गीते, चालता बोलता होणारे खेळ, यांसह हास्याचे फवारे उडत झालेल्या खेळ पैठणीचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम महिलांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे