आपला जिल्हा

चार हजार कोटींची खोटी वल्गना उघडी पडली आता जनता सावध झाली आहे : विशाल गोर्डे  

चार हजार कोटींची खोटी वल्गना उघडी पडली आता जनता सावध झाली आहे : विशाल गोर्डे  
पुलाचे श्रेय घेण्याआधी पुलाखालून वाहून जाणारे समन्यायी पाण्याचे पाप तुमचेच त्याचेही श्रेय घ्या : गोर्डे 
जाहिरात

Kopargaon vijay  kapse दि २९ जुन २०२६-२०१९ नंतरच्या कार्यकाळात आ.काळे यांनी फक्त जनतेला भुलवण्याचे काम केले. आमच्या वारी ग्रामस्थांनी वर्षानुवर्ष केलेल्या पाठपुराव्याने आणि आम्हाला रस्त्याची व पुलाची होणारे अडचण लक्षात घेऊन माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांनी वारंवार शासन दरबारी हा प्रश्न निदर्शनास आणून दिल्याने व वाचा फोडल्याने हा या पुलाच्या कामाला गती मिळाली.त्यानंतर सत्तेत आलेल्या आशुतोष काळे यांना आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याची संधी मिळाली.वारीच्या पुलासाठी देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकारातून निधी मिळाला यासाठी वारी येथील अनेक कार्यकर्त्यांनी सौ.कोल्हे यांच्या समवेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेट घेऊन हा प्रश्न लावून धरला होता. जनतेची अडचण लक्षात घेऊन शासनाने घेतलेल्या धोरणाने आणि मिळाला होता त्याचे फुकटचे श्रेय काळे यांनी घेऊन भविष्यात सत्ता मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये कारण जनतेला चार हजार कोटीच्या खोट्या वल्गना कळून चुकल्या आहेत. समन्यायी पाणी वाटप करून पुलाखालून वाहून जाणारे हक्काचे पाणी हे तुमच्याच पूर्वजांनी घालवले त्याचे देखील श्रेय घ्या असा टोला देखील काळे यांना भाजपा तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे यांनी लगावला आहे.

जाहिरात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी स्वतःची प्रकृती ठीक नसताना वारी पुलासाठी आग्रह धरून शासनाकडे आपणही सदर बाब सुचवा अशी मागणी केल्यानंतर या पुलाच्या प्रक्रियेला गती मिळाली होती.वारी, कान्हेगाव,भोजडे,शिंगवे यासह पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी कोल्हे यांची तळमळ अगदी वयाच्या नव्वदीत देखील जपली होती याची कल्पना नागरिकांना आहे.

जाहिरात
स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्य काळातील मंजूर कामांचे उद्घाटन करून श्रेय येणारे आशुतोष काळे यांनी स्वतः कधी स्वतंत्र एखादा विषय हातात घेऊन तो मार्गी लावला असे कुठलेही उदाहरण तालुक्यात नाही. सबंध मतदार संघात रस्त्यांची चाळण झाली असून केवळ शासनाने नागरिकांच्या अत्यंत संवेदनशील विषयात घेतलेल्या भूमिका देखील स्वतःचे श्रेय म्हणून मिरवण्याचे पाप काळे यांचे सुरू आहे.ज्या गोदावरी नदीच्या पुलाचे श्रेय तुम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहात त्या पुलाखालून वाहून जाणारे हक्काचे पाणी घालवण्याचे पाप तुमच्या वडिलांनी केले त्यामुळे वर्षानुवर्ष सत्ता मागण्याचा अधिकार तुम्ही गमावला आहे अशी भूमिका भाजपा तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे यांनी मांडली आहे.

विशाल गोर्डे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे