आपला जिल्हा

संजीवनी पॉलीटेक्निकच्या ३५ विद्यार्थ्यांना सुंगवू हायटेक मध्ये नोकरी

संजीवनी पॉलीटेक्निकच्या ३५ विद्यार्थ्यांना सुंगवू हायटेक मध्ये नोकरी

पालक आणि विद्यार्थी यांचा विश्वास सार्थ करणे हाच संजीवनीचा ध्यास

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १८ मे २०२६- संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निकच्या एकाच वेळी पस्तीस विद्यार्थ्यांना सुंगवू हाय टेक या मुळच्या दक्षिण कोरियाच्या ऑटोमोबाईल घटक उत्पादन करणाऱ्या कंपनीने नोकरीची संधी दिली. या सर्वांना आकर्षक पॅकेज देण्यात आले. ट्रेनींग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारातून त्यांना ही संधी मिळाली. पालक आणि विद्यार्थी यांचा विश्वास सार्थ करणे हाच संजीवनीचा ध्यास आहे.

जाहिरात

उद्योगाभिमुख शिक्षणपद्धती आणि कौशल्यविकास उपक्रमांचे हे फलित आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी संस्थेवर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवीण्यासाठी ट्रेनींग अँड प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे नोकरी किंवा उद्योगात करिअर घडावे अथवा त्याचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष मेहनत घेतली जाते. व्यवस्थापनाच्या दर्शनाखाली प्राचार्य, विभाग प्रमुख, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची संपूर्ण टीम त्यासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअर घडवीण्याच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात.

जाहिरात

नोकरीची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांत मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या तब्बल ३५ विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर निवड केली. यात अक्षय कैटाके, कार्तिक वर्खडे, आदित्य पवार, अभिषेक रहाणे, चैतण्य देवकर, अभिषेक काळे, विकास मतसागर, आकाश जाधव, किरण त्रिभुवन, सिध्दार्थ वणे, सनी गायकवाड,समर्थ रहाणे, विशाल धनवटे, ऋतिक गव्हाणे, गौरव सोनवणे, आदित्य विश्वम्भर, सार्थक सोनवणे, शिवराम शिरसाठ, विवेक वणे, श्रध्दा डेंगळे, अतुल खरड, कोमल दैने, नील पवार, प्रथमेश त्रिभान, साक्षी गुरसळ, ऐश्वर्या शिंदे , राजश्री बोठे, निकिता गांगुर्डे, विद्या जगताप, प्रियंका घोपाळ, बब्बी कुमार, सोनु कुमार, राजु प्रसाद, सनी कुमार व मोहम्मद सलाउद्दीन यांचा समावेश आहे. यातील बहुतांशी विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहे. या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे आणि कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर आदि उपस्थित होते.

जाहिरात

 

मी सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थी आहे. मी शिकून स्थिर स्थावर होवुन स्वावलंबी बनावे, ही माझ्या आई वडीलांची प्रबळ इच्छा होती. संजीवनीत प्रवेश घेतला तर काबाडकष्ट करणाऱ्या माझ्या आई वडीलांचे आणि माझ्या अर्थिक स्वावलंबनाचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास होता,तो आज सार्थ ठरला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आम्हा सर्व विद्यार्थ्यांची मुलाखतीची उत्तम तयारी करून घेतली होती.
 आकाश जाधव (विद्यार्थी)

संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सुंगवू हायटेक कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले एका तुकडीचे छायाचित्र. यावेळी प्राचार्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे