आपला जिल्हा

वादळाचा तडाखा; कोसळलेले वीज खांब व तुटलेल्या तारा तातडीने दुरुस्त करा -आ.विवेक कोल्हे

वादळाचा तडाखा; कोसळलेले वीज खांब व तुटलेल्या तारा तातडीने दुरुस्त करा -आ.विवेक कोल्हे
वादळाचा तडाखा; कोसळलेले वीज खांब व तुटलेल्या तारा तातडीने दुरुस्त करा -आ.विवेक कोल्हे
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १२ जुन २०२६कोपरगाव तालुक्यात अचानक झालेल्या वादळी पावसात अनेक ठिकाणी विजेचे खांब जमिनीवर कोसळून ठिकठिकाणी विद्युत वाहक तारा तुटल्या असून,यामुळे समस्त शेतकरी बांधवांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.संबंधित गावांमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तातडीने पाठवून विद्युत वाहक तारांची दुरुस्ती करावी तसेच नवीन वीज खांब उभारावेत, अशी मागणी आ.विवेक कोल्हे यांनी संगमनेर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.

जाहिरात
आमदार विवेक कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यात दिनांक ६ जून २०२६ रोजी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे रवंदे, दहेगाव बोलका, खिर्डी गणेश,चासनळी यांसह संबंधित भागातील सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांमधील वीज खांब व विद्युत वाहक तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील शेतकरी बांधव व नागरिकांना वेळेवर  वीजपुरवठा होत नसून अनेक ठिकाणी दिवसा-रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने जनावरांच्या पाण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची गंभीर अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागातील शेतकरी व नागरिकांनी माझ्याकडे विद्युत वाहक तारांची दुरुस्ती करून नवीन वीज खांब बसवून देण्याची मागणी केली असल्याचे आमदार कोल्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.

जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील रवंदे, दहेगाव बोलका, खिर्डी गणेश, चासनळी यांसह संबंधित भागातील सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील विद्युत वाहक तारा व वीज खांबांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेस आवश्यक त्या सूचना व आदेश देण्यात यावेत, अशी विनंती आ. विवेक कोल्हे यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे