आपला जिल्हा

राजहंस दूध संघात १३५० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प सुरू- माजी मंत्री बाळासाहेब थोरात; प्रतिदिन ५२५० वीज युनिट निर्मिती होणार.

राजहंस दूध संघात १३५० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प सुरू- माजी मंत्री बाळासाहेब थोरात; प्रतिदिन ५२५० वीज युनिट निर्मिती होणार.
राजहंस दूध संघात १३५० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प सुरू- माजी मंत्री बाळासाहेब थोरात; प्रतिदिन ५२५० वीज युनिट निर्मिती होणार.
जाहिरात

Sangmner vijay kapse दि १२ जून २०२६दूध हे महत्त्वाचे अन्न आहे. दुधाची शुद्धता आणि गुणवत्ता जपल्याने राजहंस चे राज्यभरात मोठे नाव आहे. दूध संघाचा विजेवरील होणारा खर्च टाळण्यासाठी राजहंस दूध संघाने टाटा कंपनीच्या समन्वयातून उभारलेला सौर ऊर्जा प्रकल्प कौतुकास्पद असून दररोज 1350 किलोवॅट वीज निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन दूध संघाचे मार्गदर्शक तथा राज्याचे माजी कृषी व महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते. तर व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, लक्ष्मणराव कुटे, आर.बी राहणे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, ॲड नानासाहेब शिंदे, दूध संघाचे संचालक विलासराव वर्पे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, रवींद्र रोहम, सौ प्रतिभाताई सोमनाथ जोंधळे, सौ. मंदाताई गोरख नवले, अविनाश सोनवणे ,हौशीराम सोनवणे ,सुभाष सांगळे, कन्सल्टंट विनीत शहा कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, सौर ऊर्जा प्रकल्पाचे हर्षल सातव, सिद्धार्थ थोरात यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजहंस दूध संघाने गुणवत्ता व शुद्धतेतून राज्यभर लौकिक निर्माण केला आहे. यामध्ये दूध उत्पादकांनी अधिक स्वच्छता व शुद्धता वाढविण्याबरोबर परदेशी उत्पादकांबरोबर आपली स्पर्धा करावी. दूध हे अन्न असून लहान मुलांच्या मुखात जाणारे असते त्यामुळे प्रत्येकाने अधिक काळजी घेतली पाहिजे.

जाहिरात

टाटा कंपनी उत्पादित उभ्या राहिलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून दररोज 1350 किलो वॅट वीज निर्मिती होणार आहे. पुढील तीन वर्षात प्रकल्पावरील खर्चाची परतफेड झाल्यानंतर संघाला दीर्घकाळासाठी ही वीज उपलब्ध होणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक बचतीचा हा उपक्रम सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरणारा असल्याचे ते म्हणाले याचबरोबर दूध संघाच्या वाटचालीमध्ये उत्पादकांबरोबर अनेक अधिकारी कर्मचारी यांचे मोठे योगदान राहिले असून सेवानिवृत्ती हा एक जीवनाचा टप्पा आहे. यापुढील काळात नवे क्षेत्र खुले होत असून प्रत्येकाने आनंदाने राहिले पाहिजे. अमृत उद्योग समूहातील सर्व संस्था अत्यंत चांगल्या सुरू असून या संस्थांमुळे अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले.

आ .सत्यजित तांबे म्हणाले की, दूध संघाने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला असून पुढील अडीच वर्षांमध्ये या प्रकल्पाचा खर्च वसूल होणार आहे. विजेवरील खर्चात मोठी बचत होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे .सौर ऊर्जा प्रकल्प प्रत्येकाने करावा असा हा उपक्रम असून या प्रकल्पाबाबत सरकारची काही चुकीचे धोरण आहे .याकडे लक्ष वेधावे लागेल असे ते म्हणाले.

तर चेअरमन रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाची वाटचाल सुरू आहे. सुमारे अडीच एकर परिसरामध्ये उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून दररोज 1350 किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. यातून दररोज 5220 युनिट वीज निर्मिती होणार असून महिन्याला दीड लाख युनिट वीज तयार होईल . पुढील तीन वर्षांमध्ये प्रकल्पाचा पूर्ण खर्च पूर्ण होऊन 100 टक्के मोफत वीज दूध संघाला मिळणार आहे. त्यातून मोठी बचत होणार आहे. सर्व मंजूर्यांसह तीन महिन्यात हा प्रकल्प पूर्ण झाला असल्याचे सांगताना आगामी काळात दूध शुद्धतेवर अधिक भर द्यावा लागणार असून गाव पातळीवर सोसायटी यांनी गाय गोठा ते संघ प्रक्रिया पर्यंत दुधाची काळजी घ्यावी. दूध संघाने 4 लाख लिटरपर्यंतचा टप्पा पार केला असून आगामी काळात  दूध संकलन वाढवण्यासाठी काम करावे याचबरोबर दूध संघाच्या वाटचालीमध्ये अधिकारी कर्मचारी यांचा मोठा वाटा असून हे सांघिक यश असल्याचे ते म्हणाले. यावेळी दूध कन्सल्टंट विनीत शहा यांनी गाय गोठा, सोसायटी यामधील स्वच्छता व विविध उपायोजनांबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली.

यावेळी रावसाहेब दुबे,विजय राहणे , बाबासाहेब गायकर,विलास शिंदे ,रोशन गोपने, समीर शिंदे, विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी यांनी केले तर व्हा.चेअरमन राजेंद्र चकोर यांनी आभार मानले. यावेळी दूध उत्पादक व दूध सेवा सोसायटी यांचे चेअरमन सेक्रेटरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा

दूध संघात दीर्घकाळ सेवा देणारे जनरल मॅनेजर जी.एस शिंदे, बाळासाहेब बडे, बाबासाहेब थोरात, साहेबराव खेमनर, गंगाधर बो-हाडे, रमेश कोळगे, विनायक वैद्य , वसंत थोरात, भाऊसाहेब आहेर, भानुदास घाडगे, भाऊसाहेब कानवडे ,बाळासाहेब गडाख, दौलत बटवाल, शरद गुंजाळ, भाऊ पाटील कोटकर, सोमनाथ लहारे या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे