संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १८ विद्यार्थ्यांना टीसीएसमध्ये नोकरीची संधी
संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १८ विद्यार्थ्यांना टीसीएसमध्ये नोकरीची संधी
विद्यार्थ्यांच्या करीअरसाठी संजीवनीची यशस्वी वाटचाल

Kopargaon vijay kapse दि ५ जुलै २०२६:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या एकाचवेळी अठरा विध्यार्थ्यांना टिसीएस या नामांकित कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळाली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नियोजनबध्द प्रयत्नामुळे विध्यार्थ्यांना ही उत्तम संधी मिळाली. या विध्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेचा निकाल जाहिर होण्यापूर्वीच त्यांच्या हाती नोकरीची ऑर्डर मिळाली. त्यामुळे हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सुखावून गेले. संजीवनीत प्रवेश म्हणजे उत्तम करिअर घडण्याची हमी हे समिकरण यंदाही कायम आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या करीअरसाठी संजीवनीची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

या अठरा विद्यार्थ्यांत काॅम्प्युटर इंजिनिअरीगच्या पाच, इन्फर्मेशन टेक्नालाॅजी विभागाच्या सात व इलेक्ट्राॅनिक्स अँड काॅम्प्युटर इंजिनिअरींग विभागाच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने या विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्याचवेळी नामांकित कंपन्या हवे असलेले कुशल अभियंते घडवीण्यासाठी नेमके काय करायला हवे याची रूपरेषा तयार केली. त्यानुसार विद्यार्थ्यांची तयारी करवून घेतली जात असल्याने संजीवनीच्या विध्यार्थ्यांना विविध कंपन्यांत प्राधान्याने संधी मिळते आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रविण रामकिसन थोरवे, समृध्दी अशोक त्रिभान, विरेंद्र रविद्र तरटे, अभय हरीश पेटकर यांना प्रत्येक वार्षिक पॅकेज रू ९ लाख देण्यात आले. अविष्कार मढवई व प्रतिक अरविंद शिरसाठ यांना प्रत्येकी रू ७.६० लाखांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले. फरहाण ईर्फाण पठाण, गोकुळ संजय रक्ताटे ,आकांक्षा अप्पासाहेब बेल्हेकर , साक्षी प्रसाद राजळे, साहिल अशोक थोरात, सोनिया सतिश मते, आदित्य भिमसिंग राजपुत, तृप्ती संजय शेळके, धनश्री प्रदिप शिरोळे, ईश्वरी योगेश माने, किरण विजय म्हाळसकर व वैष्णवी दत्तु निकम यांचाही या नोकरीत समावेश आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी हे विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच डायरेक्टर डाॅ. आर. ए. कापगते आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची टीमचे अभिनंदन केले.

संजीवनीमुळे मला ९ लाखाचे पॅकेज मिळाले, कुटूंबिय धन्य झाले
करिअर घडविण्यासाठी योग्य महाविद्यालयाची निवड हि यशाची पहिला पायरी असते असे माझे मत आहे. संजीवनीत प्रवेश म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि करिअर घडवीण्याची संधी हे मी ऐकले होते. संजीवनीत इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेत प्रवेश घेतला. येथे अंतिम वर्षाच्या प्रकल्पाला विशेष महत्त्व दिले जाते. माझा आयओटी आधारित प्रकल्प निवडीसाठी उपयुक्त ठरला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने मुलाखतींचा सराव करून घेतल्याने आत्मविश्वास वाढला.राष्ट्रीय स्तरावरील हॅक क्वेस्ट स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. कौशल्यात भर पडली. त्यामुळे टीसीएसमध्ये वार्षिक ९ लाख रुपयांच्या पॅकेजवर नोकरी मिळाली. संजीवनीने माझे आणि माझ्या कुटुंबाचे स्वप्न साकार केले. –वीरेंद्र तरटे (विद्यार्थी).



