वांबोरी चारी टप्पा एक शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून खरीप हंगाम साठी २१ ऑगस्ट २०२६ पासून आवर्तन

Loni vijay kapse दि २० ऑगस्ट २०२६– मुळा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये अल्प पर्जन्यमान असल्यामुळे लाभक्षेत्रातील मुळा उजवा, मुळा डावा कालव्या वरील व वांबोरी चारी टप्पा एक शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून खरीप हंगाम साठी २१ ऑगस्ट २०२६ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लाभक्षेत्रात अपुऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी खूपच खालावल्याने शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती. यासंदर्भात आ.मोनिकाताई राजळे, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अक्षय कर्डिले, आ. प्राजक तनपुरे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांची भेट घेवून खरीप पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, नगर या तालुक्यातील लाभक्षेत्रातील पिकांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे.

मंत्री विखे पाटील साहेब यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभिर्य लक्षात घेवून २१ ऑगस्ट २०२६ पासूनच आवर्तन सुरू करण्याच्या सूचना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याने लाभक्षेत्रातील पिकांना मोठा दिलसा मिळणार आहे.