आपला जिल्हा

जयहिंदच्या कला महोत्सवात १२ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

जयहिंदच्या कला महोत्सवात १२ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

कला महोत्सव विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देणारा उपक्रम : माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात
कलाक्षेत्रातील कौशल्यातून विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या संधी : थोरात

जाहिरात

Sangmner vijay kapse दि ७ सप्टेंबर २०२६ : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. संगमनेर येथे आयोजित दोन दिवसीय कला महोत्सवात तब्बल १२ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, ही कौतुकास्पद बाब आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला मोठी संधी मिळत असून, हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

जाहिरात

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय कला महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.
या महोत्सवात रंगभरण स्पर्धेत तालुक्यातील सुमारे ४५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर पर्यावरणपूरक गणपती निर्मितीमध्ये ८३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दोन दिवसांत एकूण १२ हजार विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचा लाभ घेतला. मातीकाम, पेंटिंग, वॉटर कलर, संगीत, गायन, नृत्य, झुंबा डान्स, थ्रीडी पेंटिंग, कला बाहुली निर्मिती, कॅलिग्राफी आणि ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण अशा विविध कौशल्याधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

जाहिरात

थोरात म्हणाले, “जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून निरोगी समाजनिर्मितीबरोबरच भावी पिढी समृद्ध घडविण्याचे अत्यंत चांगले काम होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यविकास वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही कलागुण असतात. त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते निश्चितच यशस्वी होऊ शकतात.”
कलाक्षेत्रातील विविध कौशल्यांमधून भविष्यात विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. जयहिंद लोकचळवळीचा हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक असून, यातून भविष्यात विविध क्षेत्रांत यशस्वी होणारी तरुणाई घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, “परिपूर्ण विद्यार्थी घडविण्याबरोबरच समृद्ध आणि सुजाण नागरिक घडविण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून सातत्याने काम केले जात आहे. दोन दिवसांच्या या शिबिरातून विद्यार्थ्यांना विविध कला-कौशल्यांचे प्रशिक्षण मिळाले असून, त्याचा उपयोग त्यांच्या भावी जीवनात निश्चितच होईल. छोट्या-छोट्या कौशल्यांतून मोठे कलाकार निर्माण होऊ शकतात.”
यावेळी डॉ. नामदेव गुंजाळ, समन्वयक प्रकाश पारखे, मुख्याध्यापक चांगदेव खेमनर, संजय मासाळ, विकास भालेराव, कला संघटनेचे अध्यक्ष संतोष गोरे, राजू गोरे, विनोद राऊत, हस्ताक्षर आर्टिस्ट सिसोदे, दत्ता बटवाल, संजय सोनवणे, बजरंग जेडगुले, साहेबराव गुंजाळ, सुनील कवडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नामदेव गुंजाळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश पारखे यांनी केले, तर चांगदेव खेमनर यांनी आभार मानले. यावेळी शहरातील नागरिक, कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे