आपला जिल्हा

शनिवारी वडगाव पान येथे मार्केट कमिटीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

शनिवारी वडगाव पान येथे मार्केट कमिटीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ; माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व वार्षिक सभा
शनिवारी वडगाव पान येथे मार्केट कमिटीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ; माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व वार्षिक सभा
Sangmner vijay kapse दि १५ सप्टेंबर २०२६- शेतकरी व्यापारी यांना अत्याधुनिक सुविधा देणाऱ्या राज्यातील अग्रमानांची असलेल्या संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ शेतकरी मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता उपबाजार वडगाव पान येथे काँग्रेस पक्षाचे नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सभापती शंकर पाटील खेमनर यांनी दिली आहे.

जाहिरात
याबाबत अधिक माहिती देताना शंकर पाटील खेमनर म्हणाले की माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील प्रगतशील बाजार समिती म्हणून ओळखली जाते शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधांबरोबर वडगाव पान येथे उपबाजार निर्माण करण्यात आला आहे या ठिकाणी असलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ शनिवारी लोकनेते बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉ.सुधीर तांबे,आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.

यामध्ये शेतकरी सुविधा केंद्र,लिलाव शेड नंबर 1 चे उद्घाटन, अंतर्गत रस्ते डांबरीकरण, लिलाव शेड नंबर 2 चे उद्घाटन, शेतकरी मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होणार आहे याप्रसंगी जैविक व विषमुक्त शेती व्यवस्थापन या विषयावर डॉ. शैलेश कुमार यांचे व्याख्यानही होणार आहे.

जाहिरात

यावेळी ॲड.माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ.मैथिलीताई तांबे, पांडुरंग पाटील घुले,सुधाकर जोशी, प्रतापराव ओहोळ, लक्ष्मणराव कुटे, राजवर्धन थोरात,गणपतराव सांगळे,संपतराव डोंगरे,रामदास पाटील वाघ,रामहरी कातोरे,बी.आर.चकोर, के.के. थोरात, सुहास आहेर, अजय फटांगरे,हौशीराम सोनवणे, बाळासाहेब गायकवाड, सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी नागरिक बंधू महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपसभापती गीताराम गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक व सचिव सतीश गुंजाळ यांनी केले आहे.

जाहिरात

शनिवारी 9 वाजता थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रतिबंध समारंभ

सहकारासाठी दीपस्तंभ असणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2026 साठीचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ शनिवार दिनांक 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 वा.मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, सौ.कांचनताई थोरात, माजी आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात,सौ.दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे