आपला जिल्हा

बुधवारी संगमनेर मध्ये महामेळा व महावादन; आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन

बुधवारी संगमनेर मध्ये महामेळा व महावादन; आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन

७५० वादक कलावंत सहभागी होणार

Sangmner vijay kapse दि १५ सप्टेंबर २०२६- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर शहर व तालुका हे सांस्कृतिक दृष्ट्या वैभवशाली ठरले आहे. पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना व्यासपीठ मिळावे याकरता आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून आय लव संगमनेर चळवळ अंतर्गत बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5.30 ते 10 या वेळेत संगमनेर बस स्थानक येथे भव्य महामेळा व महावादन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक डॉ.सौ. मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे.

जाहिरात

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मागील वर्षापासून आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेर शहरातील ढोल ताशा पथकाला राज्य व राष्ट्रीय पातळीवर वाव मिळावा या उद्देशाने या भव्य महावादन मेळाव्याचे आयोजन होत आहे. संगमनेर मधील अत्यंत प्रतिष्ठेचे संगमनेरी तांडव, हिंदू राजा प्रतिष्ठान, रुद्र प्रतिष्ठान, छावा प्रतिष्ठान व एकलव्य प्रतिष्ठान या ढोल ताशा पथकातील सुमारे 750 युवक व युवती एकत्र येऊन हा महावादन मेळावा संपन्न करणार आहे.

जाहिरात

महाराष्ट्रात ही अभिनव संकल्पना संगमनेर मध्ये प्रथम राबवली गेली आहे यामुळे संगमनेरचे अनेक कलावंत सोमनाथ गुजरात, तामिळनाडू, कलकत्ता, हिमाचल प्रदेश असे देशभरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमासाठी जात आहेत. या सर्व कलाकारांना एकत्रित आणून हा भव्य महावादन मेळावा बुधवारी संपन्न होणार आहे.

जाहिरात

गणेशोत्सवाच्या आनंद पर्व निमित्त बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5.30 ते रात्री 10 या वेळेत संगमनेर बस स्थानक येथे हा महामेळा व महावादन संपन्न होणार आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, नूर मोहम्मद शेख, निखिल पापडेजा यांच्यासह संगमनेर शहर व तालुक्यातील विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या महावादन व महामेळासाठी संगमनेर शहरातील युवक युवती व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आय लव संगमनेर चळवळ व सर्व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन

राज्यभरामध्ये डीजे च्या माध्यमातून कर्कश आवाजामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवाज कमी करावा अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र हे सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत प्रगत असून आपल्याकडे विविध वाद्य आहेत त्यापैकी ढोल ताशा पथकाला देशभरातून मागणी असून या पारंपरिक वाद्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा महावादन व महामेळा संपन्न होत आहे यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे.

आमदार सत्यजित तांबे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे