राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट कला कार्य गौरव पुरस्कार’ शिक्षक राजेंद्र बाविस्कर यांना प्रदान
राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट कला कार्य गौरव पुरस्कार’ शिक्षक राजेंद्र बाविस्कर यांना प्रदान
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि ३ ऑक्टोबर २०२६– ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट कला कार्य गौरव पुरस्कार’ कोळपेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक राजेंद्र शिवाजी बाविस्कर यांना रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित पुरस्कार सोहळ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. शैक्षणिक व कला क्षेत्रातील उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.
जाहिरात
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, उपाध्यक्ष संदीप पठारे आणि कार्याध्यक्ष सागर पवार यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, शिक्षणप्रेमी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र बाविस्कर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य चौरे पी. बी., उपमुख्याध्यापक माने सर, पर्यवेक्षक झावरे सर, आदी सर्व शिक्षकवृंद, बंधू-भगिनी आणि सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.जाहिरात