आपला जिल्हा

श्री शुक्राचार्य मंदिरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

श्री शुक्राचार्य मंदिरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

४ ते १० ऑक्टोबरदरम्यान गणेशबुवा लोहोणेरकर महाराज यांच्या अमृतवाणीतून रंगणार भक्तिरसाचा सोहळा

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ४ ऑक्टोबर २०२६–कोपरगाव तालुक्यातील बेट येथील परम सद्गुरू श्री शुक्राचार्य मंदिरात सलग तिसऱ्या वर्षी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सरोजिनी बाळासाहेब आव्हाड यांच्या वतीने आयोजित हा धार्मिक सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर ते शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे. दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत भागवताचार्य श्री. गणेशबुवा लोहोणेरकर महाराज यांच्या अमृतवाणीतून भागवत कथेचे निरूपण होणार आहे.

जाहिरात

सात दिवसांच्या या भागवत सप्ताहात भागवत महात्म्य, कपिल-परीक्षित जन्म, शुकदेव आगमन, ध्रुव चरित्र, प्रल्हाद चरित्र, नृसिंह अवतार, वामनावतार, रामावतार, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन पूजा, रुक्मिणी विवाह आणि सुदामा चरित्र आदी विविध प्रसंगांचे निरूपण करण्यात येणार आहे. या माध्यमातून भाविकांना भक्ती, श्रद्धा तसेच जीवनमूल्यांची शिकवण मिळणार आहे.

जाहिरात

सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या भागवत सप्ताहामुळे बेट व पंचक्रोशीतील भाविकांना आध्यात्मिक पर्वणी मिळणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीमद् भागवत कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व श्री शुक्राचार्य मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे