आपला जिल्हा

ज्योती सहकारी पतसंस्थेची ७१६ कोटींची व्यवसाय वाटचाल; शून्य टक्के नेट एनपीए; सभासदांना आधुनिक बँकिंग सुविधा

ज्योती सहकारी पतसंस्थेची ७१६ कोटींची व्यवसाय वाटचाल; शून्य टक्के नेट एनपीए; सभासदांना आधुनिक बँकिंग सुविधा

ज्योती सहकारी पतसंस्थेची ७१६ कोटींची व्यवसाय वाटचाल; शून्य टक्के नेट एनपीए; सभासदांना आधुनिक बँकिंग सुविधा

Kopargaon vijay kapse दि ६ ऑक्टोबर २०२६–कोपरगाव येथील ज्योती सहकारी पतसंस्था मर्या कोपरगावने आपल्या ३८ वर्षांच्या विश्वासार्ह वाटचालीत आर्थिक क्षेत्रात भरीव कामगिरी नोंदवली आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय ७१६ कोटी रुपयांवर पोहोचला असून, संस्थेने शून्य टक्के नेट एनपीए राखत आर्थिक शिस्त व पारदर्शक कारभाराची परंपरा कायम ठेवली आहे.

जाहिरात

संस्थेच्या आर्थिक स्थितीनुसार ठेवी ४३२ कोटी रुपये, कर्जवाटप २८४ कोटी रुपये, गुंतवणूक १७८ कोटी रुपये, तर स्वनिधी ३० कोटी रुपये आहे. संस्थेला आर्थिक वर्षात ४ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेची कायम मालमत्ता २.४० कोटी रुपये असून सी.डी. रेशो ६५ टक्के आहे. संस्थेचा ऑडिट वर्ग ‘अ’ असून, सभासदांना विनम्र व तत्पर सेवा देण्यावर संस्थेचा भर आहे.

जाहिरात

ज्योती सहकारी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारत असून कोपरगाव, शिर्डी, सुरेगाव (कोळपेवाडी), कोल्हार, राहुरी, श्रीरामपूर, येवला, अहिल्यानगर आणि पुणे येथे शाखांच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे. संस्थेच्या माध्यमातून सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, NEFT/RTGS, SMS सुविधा, मोबाईल कलेक्शन, सुलभ कर्ज वितरण, ज्योती मोबाईल बँकिंग, ई-चलन तसेच QR बँकिंग अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जाहिरात

अॅड. रविकाका बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने विश्वासार्हता आणि आर्थिक स्थैर्याची वाटचाल सुरू ठेवली आहे. उत्कृष्ट आर्थिक कामगिरी व सभासदाभिमुख सेवेमुळे संस्थेने सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे