आपला जिल्हा

रणजीतसिंह देशमुख यांची जिल्हा बँकेवर संचालकपदी बिनविरोध निवड

रणजीतसिंह देशमुख यांची जिल्हा बँकेवर संचालकपदी बिनविरोध निवड
रणजीतसिंह देशमुख यांची जिल्हा बँकेवर संचालकपदी बिनविरोध निवड
Sangmner vijay kapse दि ७ ऑक्टोबर २०२६-आशिया खंडात अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी राजहंस दूध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह देशमुख यांची संगमनेर तालुका सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवड झाली आहे.

जाहिरात
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेने कायम शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठी मदत केली आहे जिल्ह्यातील सर्व सेवा सोसायटी सभासद शेतकरी यांचा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर मोठा विश्वास राहिल्याने या बँकेचा आलेख कायम उंचावत राहिला.

जाहिरात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अनेक वर्षे बँकेचे नेतृत्व केले. त्यांच्या पाठोपाठ लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या बँकेला नेतृत्व दिले.

यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने ही बँक शेतकऱ्यांची आहे म्हणून बिनविरोध निवडणूक व्हावी याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांची संगमनेर कारखाना कार्यस्थळावरील अमृत कुटी येथे बैठक झाली. आणि त्यानंतर बिनविरोध निवडणुकीचे वारे वाहू लागले.

जाहिरात

संगमनेर तालुक्यातून सोसायटी मतदारसंघातून राजहंस दूध संघाचे चेअरमन व सहकारातील जाण असलेले युवा नेतृत्व रणजितसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय नेतृत्वाने घेतला याचबरोबर रणजितसिंह देशमुख यांनी या निर्णयाचा आदर करून तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणाऱ्या राजहंस दूध संघाच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला.

जाहिरात

रणजीतसिंह देशमुख यांनी दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादन वाढीबरोबरच एमडीएफ गोठे, मुरघास संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवली आणि नुकतीच मिशन 50 लिटर हे राबविण्यात आले. महाराष्ट्र राज्य दूध महासंघाचे चेअरमनपद ही त्यांनी यापूर्वी भूषवले आहे. कोरोना संकट काळात केलेली राज्यातील दूध उत्पादकांना मदत लक्षवेधी ठरली होती. दूध संघाच्या माध्यमातून सहकार आणि ग्रामीण विकास यामध्ये त्यांनी मोठे काम केले असून त्यांच्या या कामाचा फायदा नक्कीच जिल्हा बँकेत होणार आहे.

सेवा सोसायटी मतदारसंघातून ते बिनविरोध निवडून आले आहेत त्याचबरोबर भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून संगमनेर तालुक्यातून गणपतराव सांगळे यांना उमेदवारी दिली आहे.

जाहिरात

रणजितसिंह देशमुख यांच्या बिनविरोध निवडीबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे,युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. मैथिलीताई तांबे,बाजीराव पाटील खेमनर, पांडुरंग पाटील घुले,ॲड माधवराव कानवडे, सुधाकर जोशी ,शंकरराव खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे ,हौशीराम सोनवणे, रामहरी कातोरे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे सौ अर्चनाताई बालोडे, दूध संघाचे व्हा चेअरमन राजेंद्र चकोर, व सर्व संचालक मंडळ व विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

रणजितसिंह देशमुख

बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम–रणजीत सिंह देशमुख

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व तत्वांवर संगमनेरच्या सहकाराची वैभवशाली वाटचाल राहिली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संघाचे चेअरमन पद सांभाळताना दूध उत्पादकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे काम केले. जिल्हा बँकेत संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली आहे .या माध्यमातून तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त मदत करण्याबरोबर त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काम करू असा विश्वास नवनिर्वाचित संचालक रणजीतसिंह देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे