आपला जिल्हा

जैविक खतांमुळे उत्पादकता वाढीस मदत–माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

जैविक खतांमुळे उत्पादकता वाढीस मदत–माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

कारखान्यावर ९५ शेतकऱ्यांना जैविक किटचे वितरण

Sangmner vijay kapse दि ९ ऑक्टोबर २०२६–कमी पाऊस वातावरणातील बदल यामुळे पिकांवरील किडींचे प्रमाण वाढले आहे. हुमणी अळी, पायरीला, खोडकिड, व विविध कीड यांचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याबरोबर जैविक खतांच्या माध्यमातून उत्पादकता वाढीस मदत होत असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर करावा असे आवाहन  राज्याचे माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयसीएआर, भारतीय ऊस संशोधन संस्था, जैविक नियंत्रण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उपयोजना कार्यक्रम अंतर्गत 95 शेतकऱ्यांना जैविक किटचे वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन पांडुरंग पा घुले हे होते. तर व्यासपीठावर शास्त्रज्ञ डॉ.ज्ञानेश्वर बोरसे ,डॉ योगेश थोरात, संचालक संपतराव गोडगे, रामनाथ कुटे, सतीश वर्पे, योगेश भालेराव, दिलीप नागरे, रावसाहेब दुबे, सौ सुंदराबाई दुबे, माणिकराव यादव, कदम सर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, कृष्णा दिघे, कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे ,ऊस विकास अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना मा कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी झाला असून संपूर्ण राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वातावरण बदलाचा परिणाम हा कीड वाढीस कारणीभूत ठरतो. हुमनी आळी बरोबर पायरीला खोडकिड, पांढरी माशी या अळींचा प्रादुर्भाव वाढतो आहे. रासायनिक खतांपेक्षा जैविक खतांचा वापर केल्याने जमिनीमध्ये हवा खेळती राहते. खर्च कमी येतो, कीड नियंत्रण करण्यास मदत होते, शेतीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढवून उत्पादकता वाढते.

जाहिरात

शेणखत, ताग, याचबरोबर विविध जैविक घटकांमुळे जमिनीमध्ये अधिक सुपीकता वाढून उत्पादन वाढ होण्यास मदत होत असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.

तर डॉ योगेश थोरात म्हणाले की, कमी पावसामुळे हुमणी अळीचा उपद्रव वाढला आहे. पायरीला कीडही वाढत आहे. कीटक नाशकांमध्ये शेतकरी जास्त खर्च करत असून जैविक खतांच्या माध्यमातून कीटक प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत होत आहे. सातत्याने रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्याने किटकांमध्ये सुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढून त्यावर फरक पडत नाही म्हणून या बिव्हिरीया,  मेटालायझम, ट्रायकोडमा याचबरोबर विविध जैविक औषधांचा वापर केल्याने कीटकांचा प्रादुर्भाव कमी होईल असे ते म्हणाले.

तर डॉ ज्ञानेश्वर बोरसे म्हणाले की माजी कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात कारखान्याने शेतकरी व ऊस उत्पादकांना कायम चांगल्या सुविधा दिल्या आहेत. शेतीमधील ऑरगॅनिक कार्बन कमी झाला की उत्पादकता कमी होते म्हणून सेंद्रिय खतांचा वापर करा असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांनी केले तर पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीचे विविध शेतकरी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे