आपला जिल्हा

रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात कर्मवीर शंकरराव काळे यांचे अजोड योगदान-आमदार आशुतोष काळे

रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात कर्मवीर शंकरराव काळे यांचे अजोड योगदान-आमदार आशुतोष काळे

सुरेगाव-कोळपेवाडीच्या रयत संकुलात कर्मवीर जयंती सोहळा उत्साहात संपन्न

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २४ सप्टेंबर २०२६– ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या गोर गरीब मुलांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या रयत शिक्षण संस्थेच्या राज्यभर विस्तार करण्यासाठी माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असतांनाही आपल्या शैक्षणिक कार्याकडे दुर्लक्ष न होऊ देता कर्मवीर अण्णांच्या विचारांना प्रत्यक्षात कृतीची जोड देवून रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात अजोड योगदान दिले असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

जाहिरात

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती सोहळा कार्यक्रम गुरुवार (दि.२४) रोजी आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,रयत शिक्षण संस्थेला कारखान्याच्या माध्यमातून तसेच वैयक्तिक देखील मदत केली. ज्या प्रमाणे कर्मवीर अण्णांना रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत मोलाची साथ दिली वेळप्रसंगी स्वत:च्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवले त्याच प्रमाणे स्व.सौ.सुशीलामाई काळे यांनी देखील कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या खांद्याला खांदा लाऊन रयत शिक्षण संस्थेच्या भरभराटीसाठी साथ दिली. कोणत्याही शाळेची अडचण असेल त्यांनी मदत करून ती अडचण सोडवीली.

जाहिरात

कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली त्याचा लाभ घेवून आयुष्यात यशस्वी होवून आपल्या रयत शिक्षण संस्थेचे, शाळा, शिक्षक आणि आई-वडिलांचे नाव मोठे करावे त्यावेळी खऱ्या अर्थाने कर्मवीर अण्णांचे स्वप्न पूर्ण होईल असा मौलिक सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.यावेळी प्रमुख वक्ते प्रा.हनुमंतराव माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला ते म्हणाले की,अज्ञान दूर झाले की जगात कोणीही आपल्याला फसवू शकत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. समाजाच्या तळागाळातील माणसाचा विकास शिक्षणाशिवाय शक्य नाही आणि शिक्षणाचा परिसस्पर्श झाल्याशिवाय बहुजनांचा उद्धार होणार नाही, हे ओळखून कर्मवीर अण्णांनी मुलांच्या हातात लेखणीची तलवार दिली. विचारांची लढाई जिंकण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग असल्याचा त्यांचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा आहे. रयतच्या कार्यासाठी कर्मवीरांच्या धर्मपत्नी सौ. लक्ष्मीबाई पाटील यांनी केलेला त्याग तर अतुलनीय आहे. विवाहावेळी १२० तोळे सोने घेऊन आलेल्या या माऊलीने अखेरीस रयतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे मंगळसूत्रही गहाण ठेवले. हा त्याग आणि समर्पण समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील. रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर अण्णा व लक्ष्मीबाई यांच्या त्यागावर उभी राहिली असून कर्मवीर अण्णांचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे काम मा. खा. स्व.कर्मवीर शंकररावजी काळे, माजी आमदार अशोकराव काळे व त्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी अखंडपणे सुरु ठेवले आहे.आमदार आशुतोष काळे हे उच्चविद्याविभूषित, तरुण आणि विकासाभिमुख नेतृत्व असून त्यांच्या प्रयत्नांतून कोपरगाव तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संकुलातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  

यावेळी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, प्रमुख वक्ते प्रा.हनुमंतराव माने,पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कोळपे,सरपंच सुमनताई कोळपे, स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य कचरु कोळपे,शिवाजी वाबळे,राजेंद्र ढोमसे,प्रतिक काळे, दिनकर वाकचौरे, बापूसाहेब जाधव, वसंतराव कोळपे, हेमंत वाबळे, डॉ.आय.के. सय्यद, बाळासाहेब ढोमसे, रामराव जेऊघाले, मोतीराम निकम, छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे, राधाबाई काळे महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या श्रीमती नीता केदार, छत्रपती संभाजी विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक रविंद्र शिंदे आदींसह शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.रोहिणी म्हस्के व रजामुराद शेख यांनी केले तर आभार रविंद्र शिंदे यांनी मानले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे