आपला जिल्हा

विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार निवड समितीवर डॉ. खेडलेकर यांची नियुक्ती

विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार निवड समितीवर डॉ. खेडलेकर यांची नियुक्ती

संगमनेरमधून पद्मश्री रघुवीर खेडकर आणि खेडलेकर अशा दोघांची निवड

जाहिरात

Sangmner vijay kapse दि ९ ऑक्टोबर २०२६–तमाशा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार निवड समितीवर येथील लोककला अभ्यासक डॉ. संतोष खेडलेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने आज अध्यादेश जारी करून नवीन समितीची घोषणा केली आहे.

जाहिरात

सन 2006 पासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने तमाशा क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. सध्या या पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. डॉ. खेडलेकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या तमाशासाठी देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समिती, महाराष्ट्र शासनाची तमाशा कलावंत तक्रार निवारण समितीवर काम केले आहे. याचबरोबर साहित्य क्षेत्रातील देशातील सर्वोच्च अशा साहित्य अकादमी पुरस्कार निवड समितीवरही काम केले आहे. 8 ऑक्टोबर रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे समितीचे अध्यक्ष तर समिती सदस्यांमध्ये डॉ. संतोष खेडलेकर यांच्यासह पद्मश्री रघुवीर खेडकर, ज्येष्ठ तमाशा कलावती आणि विठाबाई नारायणगावकर यांच्या ज्येष्ठ कन्या मंगला बनसोडे, आतांबर शिरढोणकर, गणेश चंदनशिवे, डॉ. श्यामल गरुड यांचा समावेश आहे.

जाहिरात

डॉ. खेडलेकर यांच्या निवडीबद्दल राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेव थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराव जाधव, खान्देश तमाशा परिषदेचे अध्यक्ष शेषराव गोपाळ, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी आदिंनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे