आपला जिल्हा

स्नेहलता कोल्हे, आ. विवेक कोल्हे यांच्या मागणीला यश,श्रीक्षेत्र पुणतांबा येथील अहिल्यादेवी होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी १५ लाखांचा निधी

स्नेहलता कोल्हे, आ. विवेक कोल्हे यांच्या मागणीला यश,श्रीक्षेत्र पुणतांबा येथील अहिल्यादेवी होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी १५ लाखांचा निधी
सभापती प्रा.राम शिंदे यांचे कोल्हे यांनी मानले आभार
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १० ऑक्टोबर २०२६ :

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी १५ लाख रुपयांचा स्थानिक विकास निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीला यश आले आहे. स्नेहलताताई कोल्हे आणि आमदार विवेक कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वपूर्ण कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्नेहलताताई कोल्हे यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या समवेत घाटाची पाहणी केली होती त्याचवेळी घाट दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही सभापती शिंदे यांनी दिली होती.

जाहिरात
पुणतांबा हे गोदावरी नदीच्या तिरावर वसलेले धार्मिक आणि ऐतिहासिक क्षेत्र असून, महाराष्ट्रासह देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी तिरावरील होळकर घाटाला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या या घाटाच्या पुनर्बांधणीची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार विवेक कोल्हे यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे विशेष शिफारस करण्याची मागणी केली होती.

जाहिरात
या मागणीची दखल घेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे पत्र पाठवून त्यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याची शिफारस केली आहे. या पत्राची प्रत जिल्हा नियोजन अधिकारी तसेच आमदार विवेक कोल्हे यांनाही देण्यात आली आहे.
गोदावरीच्या तिरावर असलेला हा ऐतिहासिक घाट केवळ धार्मिक स्थळ नसून पुणतांब्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. घाटाची पुनर्बांधणी झाल्यामुळे भाविक, ग्रामस्थ आणि पर्यटकांसाठी सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.ऐतिहासिक वारशाचे जतन आणि धार्मिक स्थळांचा विकास हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. पुणतांबा येथील होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी निधीची शिफारस झाल्याने भाविक आणि ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे,अशी भावना स्नेहलता कोल्हे व आ. विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.
मागणीची दखल घेऊन तातडीने निर्णय घेतल्याबद्दल व हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे आणि आ. विवेक कोल्हे यांनी प्रा. राम शिंदे यांचे आभार मानले असून या निधीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल कोल्हे यांना ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहे. 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे