आपला जिल्हा

श्री जुनीगंगा देवीच्या महतीवर पुस्तकाचे प्रकाशन

श्री जुनीगंगा देवीच्या महतीवर पुस्तकाचे प्रकाशन

संत रमेशगिरीजी महाराजांच्या शुभहस्ते घटस्थापना दिनी पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन

Kopargaon vijay kapse दि ११ ऑक्टोबर २०२६ : बेट-जेऊरकुंभारी येथील प्रसिद्ध श्री जुनीगंगा जगदंबा देवी मंदिराची पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक महती उजेडात आणणाऱ्या ‘श्री जुनीगंगा देवी’ या माहितीपर पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन घटस्थापना दिनी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती संत रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.

जाहिरात

यावेळी श्री जुनीगंगा जगदंबा देवी मंदिराचे अध्यक्ष विलास नाईकवाडे, पुस्तकाचे संपादक सुशांत घोडके, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनचे संचालक प्रसाद कातकडे, दिलीप नाईकवाडे, अमोल नाईकवाडे, मंगल नाईकवाडे,  सुनिता नाईकवाडे,  वैशाली नाईकवाडे,  स्वाती नाईकवाडे,  मनिषा नाईकवाडे, प्रतिभा नाईकवाडे, कृष्णा प्रिंटर्सचे मनोज शिंदे, सतीश आव्हाड, विकास आढाव, अॅड. वसंतराव कपिले यांच्यासह श्री जुनीगंगा जगदंबा देवीचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी संत रमेशगिरीजी महाराज म्हणाले, “गोदातीर इतिहासच्या माध्यमातून श्री जुनीगंगा देवीची महती उजेडात आणणारी ही पुस्तिका अत्यंत वाचनीय असून प्रत्येक भाविकाने ती संग्रही ठेवावी. जुनीगंगा देवीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांनी येथील देवीच्या सेवेकऱ्यांना सेवेचा मार्ग घालून दिला आहे.”

जाहिरात

गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून संपादक सुशांत घोडके यांनी श्री जुनीगंगा जगदंबा देवीची पौराणिक माहिती, विविध आख्यायिका तसेच ऐतिहासिक संदर्भ संकलित करून पुस्तकात समाविष्ट केले आहेत. यासोबतच महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्, कुंकुमार्चनाची माहिती व १००० मंत्र, आरती, आईच्या ओव्या आणि जोगवा यांचाही पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकाच्या छपाईसाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनचे संचालक प्रसाद कातकडे व कातकडे परिवाराचे सहकार्य लाभले आहे.

पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक महती लाभलेल्या गोदातीरावरील बेट-कोपरगाव या परिसराला विशेष महत्त्व आहे. पुराणकाळात देव-दानवांमध्ये झालेल्या युद्धात समेट घडवून आणण्यासाठी देवी प्रकट झाली. ही वार्ता गुरु शुक्राचार्य यांना समजल्यानंतर ते देवीच्या भेटीसाठी गावाबाहेर आले. तेच स्थान पुढे जुनीगंगा देवीचे स्थान म्हणून प्रसिद्ध झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते. अशा विविध धार्मिक व ऐतिहासिक संदर्भांची माहिती या पुस्तकातून वाचकांना मिळणार आहे.

श्री जुनीगंगा देवीची महती, स्तोत्रे, मंत्र आणि आरती एकाच पुस्तकात उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांनी या पुस्तक निर्मितीबद्दल समाधान व्यक्त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे