आपला जिल्हा

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेस मधील नेते दिल्ली मोर्चात सहभागी

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेस मधील नेते दिल्ली मोर्चात सहभागी
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेस मधील नेते दिल्ली मोर्चात सहभागी
Sangmner vijay kapse दि १२ ऑक्टोबर २०२६-वोट चोरी करणाऱ्या केंद्र सरकार व यामध्ये मुख्य भूमिका असणारे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा व चौकशी व्हावी याकरता इंडिया आघाडीच्या वतीने आयोजित दिल्ली आंदोलनात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाराष्ट्रातील विविध नेते खासदार आमदार पदाधिकारी सहभागी झाले असून ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

जाहिरात
नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदन ते सर्वोच्च न्यायालय यादरम्यान झालेल्या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे खासदार प्रियंका गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे संजय राऊत यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख नेते व महाराष्ट्र काँग्रेस मधून माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, खासदार वर्षा गायकवाड, आमदार बंटी पाटील, आमदार डॉ विश्वजीत कदम, आमदार अमित देशमुख आमदार हेमंत ओगले, माणिकराव ठाकरे यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

जाहिरात

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय हे न्याय मागण्यासाठी ची अंतिम जागा आहे. त्यांनी देशाचा आवाज ऐकून घेतला पाहिजे. इंडिया आघाडीचा आवाज हा देशाचा आवाज आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी राहुल गांधी यांना भेटणार कारणे हे दुर्दैवी आहे.

जाहिरात

सत्ताधाऱ्यांनी जनतेचा आवाज ऐकला पाहिजे. परंतु ती त्यांची तयारी नाही .काँग्रेस सरकारच्या काळामध्ये अनेक आंदोलने झाली. सर्वांचा आवाज सरकारने ऐकला. पद्मभूषण अण्णा हजारे यांनी जंतर-मंतरवर आंदोलन केले. मुक्तपणे आंदोलन झाले .त्यामध्ये कोणताही दबाव नव्हता. मात्र दुर्दैवाने आज तसे होत नाही सध्याचे सत्ताधारी काहीही करून सत्ता हवी अशा पद्धतीने वागत असून सत्तेला चिटकून राहतात आणि जनतेचा आवाज दाबत आहेत.

स्वायत्त संस्था स्वायत्त राहिलेल्या नाहीत. त्यांच्यावर राजकीय दबाव टाकला जात आहे. मीडिया हे स्वतंत्र असून ते सुद्धा सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत आहे. जगामध्ये मीडियाच्या बाबत भारताचा 157 वा नंबर लागतो हे वाईट आहे.

महाराष्ट्रात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन खूप दिवस झाले त्यांची न्याय मागणी होती. भिमनवार यांचे खरे तर निलंबन व्हायला हवे होते. पेपर का फुटतात की ठराविक लोकांसाठी फोडले जातात. आर्थिक घोटाळ्या बरोबर इतर काय लागेबंधे आहेत याची चौकशी झाली पाहिजे.

स्वर्गीय आर आर पाटील यांच्या काळामध्ये पोलीस भरतीमध्ये अत्यंत शिस्त आणली होती. हेतू चांगला असेल तर काम चांगले होते.मात्र सध्या महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचा हेतू चांगला नसून भ्रष्ट अधिकाऱ्यांना ते पाठीशी घालत आहे.

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात  एसआयआरच्या मुद्द्यावर मागील काही दिवसांपासून सलग आंदोलन सुरू आहे. मात्र ज्ञानेश कुमारला का संरक्षण दिले जाते आहे हा मोठा प्रश्न असून निवडणूक आयोगाच्या वतीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही .सर्व प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते देत आहेत. खरे तर भाजपच्या लोकांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होते.

जाहिरा
देशाची राज्यघटना आणि लोकशाही टिकवणे अत्यंत गरजेचे असून देशाचा आवाज सरकारने व सर्वोच्च न्यायालयाने ऐकावा आणि न्याय द्यावा अशी मागणी यावेळी वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे