आपला जिल्हा

संजीवनीच्या साईकृष्ण शेलारची तैवानमधील दायेह विद्यापीठात निवड

संजीवनीच्या साईकृष्ण शेलारची तैवानमधील दायेह विद्यापीठात निवड


प्रायोजित आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपः प्रवास, निवासासह संपूर्ण खर्च विद्यापीठ करणार

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २ नोव्हेंबर २०२६ ग्रामीण भागातील विद्यार्थांना  जागतिक स्तरावरील शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्रयत्नांना आणखी एक यश मिळाले आहे. महाविद्यालयाचा विद्यार्थी साईकृष्ण विकास शेलार याची तैवानमधील प्रतिष्ठित दायेह विद्यापीठात दोन महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या इंटर्नशिपसाठी साईकृष्णचा प्रवास खर्च, निवास आणि इतर आवश्यक खर्च दायेह विद्यापीठाकडून पूर्णतः प्रायोजित करण्यात येणार आहे. विद्यापीठातील प्रा. डॉ. सिन-लियांग ओऊ यांच्या मार्गदर्शनाखाली तो ‘आयओटी आधारित बायोमेडिकल’ या आधुनिक तंत्रज्ञानविषयक विषयावर संशोधनात्मक इंटर्नशिप पूर्ण करणार आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, तैवानमधील विविध विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपसाठी जाणारा साईकृष्ण हा संजीवनीचा ७५ वा विद्यार्थी ठरला आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि संशोधनाची दारे खुली करणाऱ्या  संजीवनीच्या शैक्षणिक वाटचालीतील ही आणखी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.

जाहिरात

    तैवानला रवाना होण्यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष  नितीनदादा कोल्हे यांनी साईकृष्णचे अभिनंदन केले. तर, संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या हस्ते साईकृष्ण आणि त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, डीन ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स डॉ. महेंद्र गवळी, विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे, वडील विकास शेलार, आई जयश्री शेलार, आजोबा शांतवन शेलार व आजी फुलाबाई शेलार उपस्थित होते.

जाहिरात

   इंटर्नशिपसाठी निवड झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना साईकृष्ण शेलार म्हणाला की, परदेशातील नामांकित विद्यापीठात इंटर्नशिप करण्याचे स्वप्न अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षापासूनच पाहिले होते. तैवानमधील दायेह विद्यापीठात निवड झाल्याने माझ्यासह कुटुंबीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. ही संधी मिळविण्यासाठी संजीवनीतील प्राध्यापकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व प्रोत्साहन मोलाचे ठरले. या अनुभवाचा भविष्यातील शिक्षण आणि करिअरसाठी निश्चितच मोठा लाभ होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट  अमित कोल्हे यांच्या हस्ते साईकृष्ण आणि त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र.

 


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी  जागतिक स्तरावर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवावा, हे संस्थापक स्व. सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे यांचे स्वप्न होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे यांनीही हीच दूरदृष्टी जपत विध्यार्थ्यांसाठी  आंतरराष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. साईकृष्ण आता केवळ संजीवनीचे प्रतिनिधित्व करणार नसून तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे त्याने आपल्या वर्तनातून, शिस्तीतून आणि कामगिरीतून देशाची व संस्थेची प्रतिष्ठा उंचावेल, याची जाणीव ठेवावी. विशेषतः आयओटी आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील भविष्यातील महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास तिचा पुरेपूर लाभ घ्यावा. या आंतरराष्ट्रीय अनुभवातून ज्ञान, कौशल्य आणि संशोधनाची नवी क्षितिजे खुली करून भविष्यात देशाच्या तंत्रज्ञान विकासात योगदान द्यावे. –  अमित कोल्हे (प्रसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे