आपला जिल्हा

आत्मा मालिक गुरुकुलच्या चार विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड

आत्मा मालिक गुरुकुलच्या चार विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड

ऊर्जा संवर्धनाचा संदेश चित्रांतून मांडला; १४ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार स्पर्धा

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ३० ऑक्टोबर २०२६ : केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. युवराज शिंदे, गौरव चिंचाणे, गुंजन चौधरी आणि प्रियंका पावरा अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे असून, येत्या १४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. या यशामुळे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ऊर्जा व विजेची बचत, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेच्या पात्रता फेरीत विद्यार्थ्यांनी रंगांच्या प्रभावी वापरातून आणि कल्पक चित्रांच्या माध्यमातून ऊर्जा संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश मांडला. त्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीची आणि सर्जनशीलतेची दखल घेत गुणवत्तेच्या आधारे त्यांची पुढील राज्यस्तरीय फेरीसाठी निवड करण्यात आली.

जाहिरात

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना राज्यस्तरावर संधी मिळणे ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असून, या यशामुळे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच कला आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रातही आत्मा मालिक गुरुकुलची यशस्वी वाटचाल अधोरेखित झाली आहे. सद्गुरू आत्मा मालिक माऊली यांच्या कृपाशीर्वादाने मिळालेल्या या यशाबद्दल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, विश्वस्त मंडळातील सदस्य, व्यवस्थापक सुधाकर मलिक, साईनाथ वरपे, आत्मदर्शन बागडे, मीरा पटेल, प्राचार्य माणिक जाधव, मीनाक्षी काकडे, नितीन सोनवणे आदींनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक ज्ञानेश्वर पर्वत, गोकुळ गायकवाड, निलेश सावंत, स्वप्निल पाटील, संदीप धनवटे आणि राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देणे ही संस्थेची भूमिका

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांना विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, यासाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात विशेष पुढाकार घेतला जातो. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली, हे संस्थेसाठी अभिमानास्पद असून त्यांच्या यशाचे हे फलित आहे.

नंदकुमार सूर्यवंशी (अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट) 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे